Bheemla Nayak Hindi Trailer : साऊथ सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर 'भीमला नायक' (Bheemla Nayak) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तराण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. ‘भीमला नायक’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. या आधी 25 फेब्रुवारीला 'भीमला नायक' हा चित्रपट तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 61 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात पवन कल्याणसोबत अभिनेता राणा दग्गुबाती देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.


साऊथ सुपरस्टार पवन कल्याणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला 'भीमला नायक' या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्याची मालिका सुरू केली होती, ती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीये. 'भीमला नायक' चित्रपटगृहात येऊन 5 दिवस झाले असून, या 5 दिवसांत चित्रपटाने 140 कोटींचा व्यवसाय केला आहे. पवन कल्याण आणि राणा दग्गुबातीही या कलाकारांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.


पाहा व्हिडीओ :


 







'भीमला नायक' सातत्याने जबरदस्त गल्ला जमवत आहे. पवन कल्याणच्या या चित्रपटासोबत 'वलीमाई' आणि 'गंगुबाई काठियावाडी' हे चित्रपटही चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. या दोन चित्रपटांसमोरही 'भीमला नायक' सातत्याने जबरदस्त कमाई करत आहे, यावरूनच पवन कल्याण आणि राणाची जुगलबंदी प्रेक्षकांना किती आवडलीये, हे समजू शकते.


'भीमला नायक' या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपट रसिक पुन्हा चित्रपटगृहात दाखल झाले आहेत. त्यामुळे व्यापार क्षेत्रातील जाणकार चांगलेच आनंदी झाले आहेत. कोरोनामुळे चित्रपटगृहांपासून दूर राहिलेले प्रेक्षक पवन कल्याणमुळे परतले असल्याचे व्यापार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला देशाबरोबरच परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha