Arun Jakhade Passed Away : मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक अरुण जाखडे यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ संपादक अरुण जाखडे यांनी पद्मगंधा प्रकाशन सुरु करुन अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. त्यांनी मराठी प्रकाशक परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. याशिवाय त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. 


पद्मगंधा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून  त्यांनी  जगभरातील तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेतील अनुवाद देखील प्रकाशित केले आहेत. यामध्ये 'अगाथा खिस्ती यांची हर्क्यूल पायरट मालिका', पाउलो कोएल्हो यांची 'द अलकेमिस्ट' आणि 'द जहीर' ही पुस्तकं, टोनी मॉरिसन यांचे 'बिलव्हड' हे पुस्तक, जीन पॉल सार्ट्रे यांचे 'ली मॉट्स' आणि सिमोन दी ब्यूवॉयर यांचे 'द सेकंड सेक्स' या पुस्तकांचा समावेश आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील लोकसाहित्य, लावणीचा शैक्षणिक अभ्यास आणि साहित्यिक समीक्षा यांच्यावरील 40 हून अधिक पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. 


अरुण जाखडे हे एक मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक आहेत. पद्मगंधा ही त्यांची प्रकाशनसंस्था. गणेश देवी, रा.चिं. ढेरे, व.दि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचं ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सातत्यानं लेखन केलं. त्यांच्या संपादकत्वाखाली 'पद्मगंधा' आणि 'आरोग्य दर्पण' हे दिवाळी अंक प्रकाशित होत होते. 


अरुण जाखडे यांनी लिहिलेली पुस्तकं : 



  • इर्जिक 

  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

  • पाचरुट (कादंबरी)

  • पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)

  • People's Linguistic Survey of India, दुसरा भाग - The Languages of Maharashtra - 17वा खंड (इंग्रजी, सहलेखक : गणेश देवी)

  • प्रयोगशाळेत काम कसे करावे

  • भारताचा स्वातंत्र्यलढा

  • भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण

  • विश्वरूपी रबर

  • शोधवेडाच्या कथा

  • हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनिल मेहता यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा