Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नसोहळ्याच्या चर्चा कित्येक दिवसांपासून रंगलेल्या. 23 नोव्हेंबरला दोघेही लग्नगाठ (Smriti Mandhana Palash Muchhal Wedding) बांधणार होते. पण, लग्नाच्या आदल्या रात्री स्मृतीच्या वडिलांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे स्मृती, पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. तेवढ्यात अचानक सोशल मीडियावर पलाश मुच्छलच्या नावानं फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले. त्यानंतर दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडलाय, अशा चर्चा सुरू झाल्या. तसेच, अनेक गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या. तेवढ्यात श्रीनिवास मानधना यांच्यापाठोपाठ पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं. सुरुवातीला सांगलीला, त्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात पलाशला दाखल करण्यात आलेलं. अशातच आता पलाशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याचे हेल्थ अपडेट्स शेअर केले आहेत.
स्मृती मानधनासोबतचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छललाही रुग्णालयात दाखल केलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांतच असं उघड झालंय की, अचानक छातीत दुखू लागल्यानं पलाशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. अशातच पलाशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पलाशची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्ट्रेसमुळे पलाशच्या प्रकृतीत बिघाड झालेला. मिड-डेच्या वृत्तानुसार, छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर पलाशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पलाशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. दीपेंद्र त्रिपाठी म्हणाले की, "पलाशची प्रकृती हृदयविकाराच्या झटक्यामुळे बिघडलेली नव्हती, तर स्ट्रेसमुळे त्याला त्रास होत होता..." दरम्यान, पलाशला सुरुवातीला सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे पलाशनं सांगितलेल्या तक्रारींवर त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. तिथे त्याची प्रकृती सुधारली नाही, तेव्हा त्याला सोमवारी (24 नोव्हेंबर) उशिरा मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं.
पलाशला मुंबईतील SRV रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पलाशला छातीत दुखू लागलेलं, अस्वस्थ वाटत होतं आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागलेला. त्यानंतर डॉक्टरांनी ECG आणि 2D इकोकार्डियोग्राफीसह सर्व आवश्यक कार्डियक टेस्ट केल्या. पण, त्यामध्ये कार्डियक किंवा कोणतीही मेडिकल एमर्जन्सी नव्हती. अशातच बेसिक उपचार देण्यात आले. ऑक्सिजन थेरपी लगेचच सुरू करण्यात आली. त्यानंतर स्टेबल झाल्यानंतर पलाशला जनरल रुममध्ये हलवण्यात आलं.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या पलाशची प्रकृती स्थिर आहे. आता लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. पण, डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
पलाश मुच्छल स्मृती मानधनाला चिट करत होता? (Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding)
पलाश मुच्छलच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आधीच्या डेटिंगच्या अफवा आणि रिलेशनशिप्सबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. स्मृतीसोबतच्या रिलेशनशिपच्या आधी आणि नंतरही पलाशचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर, त्यानं त्या मुलींनाही सेम टू सेम स्मृतीसारखंच गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज केल्याचं बोललं जात आहे. पलाशनं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? याचा कच्चाचिठ्ठाच नेटकऱ्यांनी बाहेर काढलाय. हे सर्व पाहून अनेकांना धक्का बसलाय. तसेच, आता या सर्व प्रकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांनी पलाशची बाजू घेतलीय, तर अनेकांनी स्मृती मानधनाला सहानुभूती देऊन पलाशपासून दूर राहण्याचाच सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :