Ahmedpur News : सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख करत लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका केलीय. महायुती टिकली नाही गद्दार म्हणून सन्मान करणाऱ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांची वेळी गेली आहे. असा सल्लाही अमित देशमुख यांनी अहमदपूरकरांना दिलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरूद्ध भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वादात आता कोंग्रेसच्या अमित देशमुखांनी एन्ट्री केली आहे. तर महायुतीतील कलहावर काँग्रेसने आता घणाघात सुरु केल्याने अहमदपूरचे राजकारण तापलं आहे. तर गद्दारीचा मुद्दा यंदा निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.
Amit Deshmukh: ....तर अहमदपूरकरांनी त्यांच्या मागे का जावं?
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील ‘गद्दारी’च्या आरोप–प्रत्यारोपांवर आता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनीही थेट भाष्य केलं आहे. भर सभेत बोलताना अमित देशमुख यांनी “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” अशा उपरोधिक शैलीत महायुतीतील गोंधळावर टोलाही लगावला. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना गद्दार म्हणत सन्मान करत असताना अहमदपूरकरांनी त्यांच्या मागे का जावं? असा सरळ प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली; लातुरात युतीत बिघाड
अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार एकत्रित येत असून, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत गद्दारी केली. आता गद्दारांना क्षमा नाही असे विधान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
Amit Deshmukh: ज्या पक्षाचं भवितव्यच अंधारात, त्या पक्षांच्या भानगडीत पडू नका
घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या चिन्हावर मतदान करणे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. मतदारांनी त्या भानगडीत पडू नये. असा सल्लाही आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूरकरांना दिलाय. अजित पवार आणि शिंदे यांच्या पक्षांच्या चिन्हांवरच अनिश्चितता, ज्या पक्षाचं भवितव्यच अंधारात त्या पक्षांच्या भानगडीत मतदाराने पडू नका. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांच्या चिन्हांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही चिन्ह त्यांच्या पक्षाकडेच राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. त्यामुळे ज्या पक्षाचं भवितव्यच अंधारात आहे. त्या पक्षांच्या भानगडीत मतदाराने पडू नका, असा सल्ला आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूरमध्ये मतदारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: