2 Players Died on a Basketball Court In Haryana 3 Day : हरियाणातील खेळाडू इंटरनॅशनल लेव्हलवर देशाचं नाव मोठं करतात, तिथे खेळांना प्रोत्साहन दिलं जातं… पण गेल्या काही दिवसांतील दोन भीषण घटनांनी सिस्टमचं खरं रूप जगासमोर आलं आहे. निष्काळजीपणा आणि भ्रष्ट व्यवस्थेची पोलखोल झाली. रोहतक आणि बहादुरगड येथे बास्केटबॉलचा पोल अंगावर पडून राष्ट्रीय स्तरावरील दोन तरुण खेळाडूंनी जीव गमावला आहे. (Two players die after basketball pole falls in Rohtak and Bahadurgarh)
रोहतकमध्ये 16 वर्षीय हार्दिकने गमवला जीव (Hardik Rathee dies Basketball Pole Fell)
रोहतकच्या लाखन माजरा गावातील कोर्टात 16 वर्षांचा हार्दिक राठी जो नेशनल लेव्हलचा खेळाडू आहे. बुधवारी सकाळी एकटाच सराव करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की हार्दिक पोलकडे धावत जातो, त्याला पकडतो, आणि पुढच्याच क्षणी 750 किलो वजनाचा लोखंडी पोल त्याच्या अंगावर पडतो. शेजारील खेळाडूंनी त्याला तातडीने बाहेर काढून रोहतकच्या दवाखान्यात नेलं. पण डॉक्टरांनी हार्दिकला मृत घोषित केलं. हार्दिक 10वीचा विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर पदकं मिळवलेला टॅलेंटेड खेळाडू होता. पण सिस्टिमच्या बेजबाबदारपणाचा बळी ठरला.
बहादुरगडमध्ये अगदी तसाच प्रकार....
या दुर्घटनेच्या काही दिवस आधी बहादुरगडच्या होशियारसिंह स्टेडियममध्ये 15 वर्षीय अमन ट्रेनिंग करत होता. अचानक पोल पडला, अमन गंभीर जखमी झाला. त्यालाही दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यानेही प्राण गमावले.
सिस्टिम फेल! व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा...
या दोन अपघातांमुळे क्रीडा व्यवस्थापन आणि यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे. क्रीडा मैदानांमधील पोलची खराब स्थिती आणि नियमित तपासणीचा अभाव हे यातून दिसून येते. अशा घटनांचा थेट संबंध देखभाल आणि देखरेखीच्या अभावाशी आहे. भ्रष्टाचार देखील यात सामील असू शकतो, कारण खेळांसाठी राखीव ठेवलेले बजेट मैदानावर वापरले जात नाही.
लोक या दोन तरुण खेळाडूंच्या मृत्यूला अपघात नाही तर गुन्हा म्हणत आहेत. जनता आणि कुटुंबे आग्रह धरतात की हे जाणूनबुजून केलेले निष्काळजीपणा होते आणि भविष्यात खेळाडूंचे मृत्यू रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
हे ही वाचा -