Palak Muchhal Name In Guinness Book: सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) गायिका पलक मुच्छल (Palak Muchhal), जी तिच्या सुमधूर आवाजासाठी आणि सोलफुल म्युझिकसाठी ओळखली जाते. तिनं आता एक नाव विक्रम रचला आहे. पलक मुच्छलनं आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness World Records) आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Limca Book of Records) स्थान मिळवलं आहे. पण, हा सन्मान तिला तिच्या गाण्यासाठी मिळालेला नाही, तर तिच्या समाजकार्यासाठी मिळाला आहे.
इंदूरमध्ये (Indur) जन्मलेल्या पलक मुच्छलनं 'पलक पलाश चॅरिटेबल फाउंडेशन'च्या माध्यमातून भारत आणि परदेशातील वंचित मुलांना मदत केली आहे. तसेच, जवळजवळ 3,800 हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारला आहे.
पलकनं मदत करण्याचं स्वतःलाच दिलेलं वचन
पलकनं लहानपणापासूनच गरजूंना मदत करण्याचा निश्चय केलेला. लहानपणी एका ट्रेन प्रवासादरम्यान ती काही वंचित मुलांना भेटलेली. त्या क्षणानं तिचं आयुष्य बदलून टाकलं. त्या दिवशी तिनं स्वतःला वचन दिलं की, एक दिवस नक्कीच ती त्यांना मदत करेल. आज तिनं तिच्या कमाईचा एक खूप मोठा भाग वंचित मुलांचा जीव वाचवण्यासाठी दिला आहे. खर्च केला आहे.
कारगिल शहीदांच्या कुटुंबांना मदत करणं
पलक गेल्या अनेक वर्षांपासून कारगिल शहीदांच्या कुटुंबांना मदत करतेय. तिनं गुजरात भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 10 लाख रुपये दान केलं आहे. पलक ही केवळ मुलांनाच नाही तर समाजातील इतर घटकांनाही मदत करण्यात अग्रेसर आहे. तिनं कारगिल शहीदांच्या कुटुंबीयांना मदत केली आणि गुजरात भूकंपग्रस्तांना 10 लाख रुपयांची मदत केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पलक मुलांसोबत वेळ घालवताना दिसतेय.
मदत करणं कधीच थांबणार नाही
पलकनं 'मेरी आशिकी', 'कौन तुझे', 'सनम तेरी कसम', 'इक मुलाकात', 'देखा हजारों दफा' आणि 'प्रेम रतन धन पायो' सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. तिचे पती मिथुन शर्मा देखील एक संगीतकार आहेत. या प्रवासात ते पलकच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी सांगितलं की, जरी शो नसले किंवा उत्पन्न नसलं तरी मुलांच्या शस्त्रक्रिया कधीही थांबणार नाहीत.
स्मृती मानधनाशी खास कनेक्शन
पलक मुच्छलचं स्मृती मानधनाशी खास कनेक्शन आहे. स्मृती मानधना पलकची होणारी वहिनी आहे. पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना रिलेशनशिपमध्ये आहेत. तसेच, लवकरच दोघांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
तारीख ठरली, मुहूर्त काढला; सांगलीत धुमधडाक्यात पार पडणार स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा लग्नसोहळा