Hira Mani : पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानीचा (Hira Mani) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींबाबत कमेंट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिनं करिना कपूरच्या (Kareena Kapoor) वजनाबाबत कमेंट केली. त्यामुळे आता तिला अनेक नेटकरी ट्रोल देखील करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री हिरा मानी ही तिच्या वेट लॉस जर्नी बाबत सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हिरा मानीचा पती देखील दिसत आहे. हिरा व्हिडीओमध्ये म्हणते, 'माझं वजन वाढले होते. तेव्हा माझ्याकडे ट्रेनर नव्हता. माझ्याकडे फक्त माझा पती होता. त्यांनी माझे वजन कमी केले. त्यांनी जेवढे माझे वजन कमी केले तेवढं कोणताच ट्रेनर करू शकत नाही. त्यानं मला वर्क-आऊट करण्यास सांगितलं. वर्क-आऊटमुळे तीन महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन कमी केलं. माझं वजन तेव्हा 64 किलो एवढं होतं. '
पुढे ती म्हणाली, 'माझा पती मला नेहमी टोमणे मारात होता. तो म्हणत होता की कतरिनाकडे बघ, दीपिकाकडे बघ, करिना तर आता जाड झाली आहे. तेव्हा मी त्याला सांगत होते की मी कतरिना नाहिये मला दोन मुलं आहेत. पण मला वाटतं टोमणे मारणारे पती चांगले असतात. त्यामुळे पत्नीचं वजन कमी होतं.'
संबंधित बातम्या