Anek :  गेल्या काही दिवसांपासून 'राष्ट्रभाषा' या विषयाबाबत  सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अभिनेता अजय देवगण  (Ajay Devgn) आणि दाक्षिणात्य अभिनेता किच्चा यांच्यामध्ये हिंदी भाषेवरून ट्विटर वॉर सुरू होतं. आता नुकताच अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana)  'अनेक' (Anek) या चित्रपटामधील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये हिंदी भाषेबद्दलचे डायलॉग आयुष्मान म्हणताना दिसतोय. 


व्हिडीओमध्ये आयुष्मान गाडी चालवताना दिसत आहे. या गाडीमध्ये त्याच्यासोबत एक व्यक्ती देखील दिसत आहे. त्या व्यक्तीला आयुष्मान हिंदी भाषेबाबत विचारतो. त्यानंतर  'फक्त भारतीय कसा असतो?' असा सवाल त्या व्यक्तीला आयुष्मान विचारतो.तो म्हणतो, 'उत्तर भारतीय नाही, दक्षिण भारतीय नाही, पूर्व भारतीय नाही, पश्चिम भारतीय नाही. फक्त भारतीय व्यक्ती कसा असतो?'





'अनेक' या चित्रपटामध्ये भारतामधील ईशान्य भागामध्ये असलेल्या राजकीय अशांततेचा मुद्दा मांडण्यात आला आहे.  चित्रपटाचे कथानक हे वर्णद्वेष आणि भाषिक राजकारणाच्या मुद्द्यांवर आधारित आहे.  ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी यावर रिअॅक्शन दिली आहे. तसेच अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.


अभिनेत्री तापसी पन्नूनं ट्वीट शेअर करून तिची प्रतिक्रिया दिली. ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'फक्त भारतीय व्यक्ती कसा असतो? ' वा! काय पंच लाईन आहे. जिंदाबाद'



 


एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'वाव, खूप चांगला प्रोमो आहे. आपणं 'अनेक' असूनही एक आहोत. '


 



हेही वाचा :