Lollywood Pakistani Actress Looks Same Like Alia Bhatt: बॉलिवूडची (Bollywood) राधा, चुलबुली अभिनेत्री म्हणजे, आलिया भट्ट (Alia Bhatt). आलिया भट्टची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही. परदेशातही लोक आलिया भट्टचे मोठे फॅन्स आहेत. आलियाची क्रेझ इतकी आहे की, तिच्यामुळे इतर देशातील अभिनेत्रींनाही काम मिळतंय... असं आम्ही नाही म्हणत, तर तिच्यामुळे काम मिळालेली अभिनेत्री सांगतेय असं. आलिया भट्टमुळे तिला काम मिळाल्याचं तिनं जाहीरपणे सांगितलं आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, जी आलिया भट्ट सारखीच दिसते. नुकतंच या अभिनेत्रीनं आलिया भट्टचे आभार मानले आहेत. ज्यानंतर ती चर्चेचा विषय ठरतेय. ही अभिनेत्री कोण? तिनं आलियाला थँक्यू का म्हटलं? जाणून घेऊयात सविस्तर...
अरे बापरे... ही तर हुबेहुब आलियाच...
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून आलियाची कार्बन कॉपी हानिया आमिर (Hania Aamir) आहे. हानिया पाकिस्तानची रहिवाशी आहे. हानिया आमिर लॉलिवुडमध्ये (पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री) तिच्या कामापेक्षाही तिच्या दिसण्यामुळे फारच प्रसिद्ध आहे. ती हुबेहुब आलिया भट्टसारखी दिसते. आता तर लोक तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून ओळखू लागले आहेत. जसं भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड म्हटलं जातं, त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या धर्तीवर पाकिस्तानी चित्रपटसृष्टीला लॉलिवूड म्हणून ओळखलं जातं.
पाकिस्तानची आलिया भट्ट... मिळालेल्या या नव्या ओळखीमुळे हानिया आमिर खूपच आनंदी आहे. तिला आलिया भट्ट का म्हणतात, याचा खुलासा तिनं स्वतः केला आहे. हुबेहुब आलियासारखं दिण्यासाठी हानिया आमिर तिच्या गालावरील डिंपल्स कारणीभूत असल्याचं सांगते. हानिया आमिरनं स्वतः याबाबत अनेक मुलाखतींमध्ये बोलताना खुलासा केला आहे. हानियानं सांगितलं की, तिच्या गोल चेहऱ्यामुळे आणि डिंपल्समुळे लोक तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हटलं जातं.
आलियाला म्हटलं थँक्यू
आलिया भट्ट प्रमाणे दिसत असल्यामुळे तिला ब्रांड एंडोर्समेंटचं काम मिळून जातं. हानिया आमिरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एका ब्रँडनं आलिया भट्टला साईन केलं आहे. त्याच ब्रँडला वाटलं की, पाकिस्तानातही असाच सिमिलर फेस मिळाला पाहिजे, जो इनोसेंट असेल आणि चेहऱ्यावर डिंम्पलही असतील. त्यावेळी त्या ब्रँडनं हानिया आमिरला अप्रोच केलं आणि त्यांना काम मिळालं. यामुळे हानिया आमिरनं आलिया भट्टचे आभार मानले आणि तिच्यामुळेच मला काम मिळतंय, असंही म्हटलं आहे.