नाशिक : जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बसचालकाचे बसवरील (Nashik Bus Accident) नियंत्रण सुटल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा दु:खद मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.  


नेमकं काय घडलं? 


मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र याच वेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण तिघांना चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 


बसचालक पोलिसांच्या ताब्यात


मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मृत महिला मूळची आंध्र प्रदेश राज्यातील.


काही तांत्रिक अडचण आल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या बसने तीन प्रवाशांना चिरडले यात अंजली थट्टीकोंडा ही महिला प्रवाशी जागीच मृत्युमुखी पडली आहे. ही भाविक महिला आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. बस चालक उमेश भाबड याला मुंबई नाका पोलिसांची ताब्यात घेतले. अपघात नेमका कशामुळे झाले याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.  


Nashik Bus Accident :



हेही वाचा :


Garud Puran: आत्महत्या, अपघात अशा अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरूड पुराणात सांगितलंय रहस्य, जाणून घ्या..


लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू


Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर