Oscar 2025 Shortlist Film Santosh Release Date In India: आमिर खान प्रॉडक्शनचा सिनेमा 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) हा ऑस्कर 2025 (Oscar 2025) च्या शर्यतीतून पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. पण युनाडेट किंगडमच्या ‘संतोष’ (Santosh) या हिंदी चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा अजूनही भारतात प्रदर्शित झालेला नव्हता. पण नुकतच आता या सिनेमाच्या निर्मात्यांनी 'संतोष' सिनेमा भारतात रिलीज करण्याची डेट जाहीर केली आहे.
शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार यांचा दमदार अभिनय असलेला UK हिंदी चित्रपटाला 'संतोष' ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळालं. त्यानंतर हा सिनेमा भारतात रिलीज होण्याची आता वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी भारतात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका प्रेस नोटनुसार, शहाना गोस्वामी स्टारर 'संतोष' पुढील वर्षी म्हणजेच 10 जानेवारी 2025 रोजी भारतात रिलीज करण्यात येणार आहे.
'संतोष'ला ऑस्करमध्ये कोणत्या श्रेणीत स्थान मिळाले?
उत्तर भारतातील ग्रामीण भागातील या सिनेमाला ऑस्कर 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. जगभरातील देशांनी सादर केलेल्या एकूण 85 चित्रपटांपैकी, एकूण 15 चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टसाठी निवडले गेले आहेत.हा चित्रपट युनायटेड किंगडमने ऑस्कर 2025 पाठवला होता. मे 2024 मध्ये 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि समीक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
काय आहे संतोषची गोष्ट?
या चित्रपटाची कथा एका महिलेची कथा आहे, जिला तिच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी पोलिसांची नोकरी मिळते. या महिलेचं नाव संतोष, जी अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येचा तपास करते. यानंतर तिचा सामना गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या विश्वाशी होतो. या सिनेमात सुनीता राजवार एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत, जी एका दलित मुलीच्या हत्येचं गूढ उकलते. तर शहाना मुख्य भूमिकेत आहे.