Oscars 2024 To Kill A Tiger : 'ऑस्कर 2024' (Oscars 2024) हा बहुप्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला आहे. 'ऑस्कर 2024'साठी (Academy Awards) भारताच्या 'टू किल अ टायगर' (To Kill A Tiger) या माहितीपटाला नामांकन मिळालं मिळालं होतं. या माहितीपटाकडून भारतीयांच्या खूप अपेक्षा होत्या. पण या माहितीपटाला ऑस्कर न मिळाल्याने असंख्य भारतीयांचे स्वप्न भंगले आहे.
'टू किल अ टायगर'ला कोणी हरवलं?
'20 डेज इन मारियुपोल' (20 Days in Mariupol) या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. माहितीपटाच्या कॅटेगरीत पाच डॉक्टुमेंट्रींला नामांकन मिळालं आहे. यात बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट, द इटरनल मेमोरी, फोर डॉटर्स, टू किल आणि टायगर आणि 20 डेज इन मारियुपोल या माहितीपटांचा समावेश होता. यात '20 डेज इन मारियुपोल' या माहितीपटाने बाजी मारली आहे. टिस्लॉ चेरनो (Mstyslav Chernov) आणि मिशेन मिजनर आणि रॅनी अरोनसरन-रॅथ यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
'टू किल अ टायगर'बद्दल जाणून घ्या... (To Kill A Tiger)
भारतातील एका छोट्याशा खेड्यातील घटनेवर आधारित ‘टू किल अ टायगर’ 'टू किल अ टायगर' हा माहितीपट आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन दिल्लीच्या निशा पहुजा यांनी केले आहे. टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या माहितीपटाचा प्रीमियर झाला होता. त्यावेळी या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फिल्म श्रेणीत ‘एम्प्लिफाई व्हॉईसेस’ पुरस्कार मिळाला होता. १३ वर्षीय मुलीचे अपहरण आणि तिच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी रणजीत नावाच्या व्यक्तीने केलेल्या खडतर संघर्षाचे चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. या माहितीपटाची निर्मिती कॉर्नेलिया प्रिन्सिप आणि डेव्हिड ओपेनहाइम यांनी केली आहे.
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा 'टू किल अ टायगर'
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा 'टू किल अ टायगर' या माहितीपटाचा भाग आहे. या माहितीपटाची ही एग्जीक्यूटिव्ह प्रोड्यूसर आहे. माहितीपट पाहून प्रियांका प्रभावित झाली होती. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं होतं. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा माहितीपट पाहता येईल.
संबंधित बातम्या