Nushrratt Bharuccha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूनं  (Nushrratt Bharuccha) ‘जय संतोषी मां’या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. प्यार का पंचनामा आणि सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटांमुळे नुसरतला विशेष लोकप्रियता मिळाली. आता लवकरच नुसरतचा जनहित में जारी (Janhit Me Jaari) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या नुसरत ही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.   

Continues below advertisement


6000 महिलांसोबत डान्स करुन केला वर्ल्ड रेकॉर्ड
नुसरत भरुचा आणि अनुद सिंह ढाका हे सध्या त्यांच्या ‘जनहित में जारी’ या आगामी चित्रपटचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशन दरम्यान त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी जयपूरमध्ये 6000 महिलांसोबत घूमार हा डान्स करुन वर्ल्ड रेकॉर्ड केला. 


व्हिडीओ होतोय व्हायरल 
नुसरत आणि अनुद यांच्या महिलांसोबत घूमर करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनमध्ये महिला या  पारंपरिक राजस्थानी लूकमध्ये दिसत आहेत. 





विनोद भानुशाली आणि राज शांडिल्य निर्मित 'जनहित में जरी' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 10 जून 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पावेल गुलाटी, अन्नू कपूर आणि परितोष त्रिपाठी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


हेही वाचा :