मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेकांना त्यांची कला सादर करण्याचं माध्यम मिळतं. युट्युब, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक नावारुपाला आल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या युट्युबवर अनेकजण त्यांची कला सादर करुन त्यामाध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच नवोदित कलाकारांचं गाणं सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आलं. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने हे रोमँटीक गाणं तरुणाईच्या देखील पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गीतकार प्रज्ञा पळसुले यांनी ‘मिराहिर’ या अल्बमअंतर्गत लिहिलेली श्वास आणि एकटा एकटा जीव ही दोन गाणी युट्युबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. पलाश प्रोडक्शनच्या ऑफिशियलयूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आली आहेत. अवघ्या चार दिवसांत या गाण्याला प्रेक्षकांनी देखील चांगली दाद दिल्याचं पाहायला मिळालं. शनिवार 10 फेब्रुवारी रोजी ही दोन्ही गाणी प्रदर्शित करण्यात आली. दरम्यान या दोन्ही गाण्याच्या लेखनाची, दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा ही प्रज्ञा पळसुले यांनी सांभाळली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांच्या या प्रवासाविषयी माहिती दिली.
निमिर्तीमध्ये सुरुवातीला पाऊल ठेवताना त्रास झाला - प्रज्ञा पळसुले
पलाश प्रोडक्शन या निर्मितीसंस्थेकडून एकटा एकटा जीव आणि श्वास ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. तसेच मार्च महिन्यात आणखी चार गाणी प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मित्यांनी दिलीये. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना त्रासच होतो. मी गाणी लिहिली होती. अनेकांना ती दाखवली पण कोणताही प्रतिसाद कोणाकडून आला नाही. त्यामुळे मी ही गाण्यांची निर्मिती स्वत: करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरुवातीला निर्मिती क्षेत्रात उतरताना मला अडचणींचा सामना करावा लागला,अशी प्रतिक्रिया या गाण्यांच्या निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका प्रज्ञा पळसुले यांनी दिली आहे.
जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहणार नाही तोपर्यंत लोकं आपल्यापर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे जेव्हा दोन्ही गाणी दिग्दर्शित झाली तेव्हा छान वाटलं पण आता आपल्याला लोकापर्यंत पोहचायचं आहे, असंही प्रज्ञा यांनी म्हटलं. तसेच त्यांचा चाहुलखुणा या काव्यसंग्रह देखील 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून आम्ही नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हे गाणं तरुणाई आणि जुन्या लोकांनाही तितकचं जवळचं वाटलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील निर्मात्यांनी दिली.
दोन्ही गाण्यांसाठी 'या' कलाकारांची निवड
या दोन्ही गाण्यांसाठी शास्वत सौरव, ऋतुजा कुलकर्णी या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. तसेच या गाण्याचे लेखन, संगीत, दिग्दर्शन आणि निर्मिती प्रज्ञा पळसुले यांनी केलीये. या गाण्याच्या संगीत निर्मितीची धुरा आरोह कांगो यांनी सांभाळली असून आकाश घरत यांच्या आवाजात हे गाण संगीतबद्ध करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा :