Netflix Film Raat Akeli Hai: नेटफ्लिक्सवर (Netfilx) चाहत्यांना पाहण्यासाठी अनेक सर्वोत्तम सिनेमे (Movies) आणि सीरिज (Web Seires) आहेत. पण, आज आपण ज्या मर्डर मिस्ट्रीबद्दल बोलत आहोत, त्या तुम्हाला शेवटपर्यंत इतक्या खिळवून ठेवतात की, तुम्ही पुरते भंडावून जाल. या मर्डर मिस्ट्रीमध्ये (Murder Mistry) सुरुवातीपासूनच सस्पेन्स सुरू होतो, जो प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. सिनेमाची कथा एवढी गुंतागुंतीची आहे की, पुढे काय होईल, याची कल्पनाही तुम्ही नाही करू शकत. आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) नवी मर्डर मिस्ट्री, 'रात अकेली है: द बन्सल मर्डर्स'बद्दल बोलत आहोत, ज्या सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. 

Continues below advertisement

नेटफ्लिक्सचा सर्वात हादरवणारा सिनेमा (Netflix Movies)

जर तुम्ही मर्डर मिस्ट्री सिनेमांचे चाहते असाल, तर तुम्ही नेटफ्लिक्सचा 'रात अकेली है: द बन्सल मर्डर्स' पाहू शकता. प्रत्येक दृश्य इतकं मनमोहक आणि उत्साहवर्धक आहे की, तुम्ही एका मिनिटासाठीही डोळे बंद करू शकणार नाही. चित्रपटाची कथा एकाच कुटुंबातील सहा सदस्यांच्या हत्येनं सुरू होते, त्यानंतर अशा अनेक रहस्यमयी ट्विस्ट्स अँड टर्न्स येतात, ज्या तुम्हाला थक्क करून टाकतील. एकदा तुम्ही सिनेमा पाहायला सुरुवात केली की, तुम्ही अजिबात थांबणार नाही, एवढा तुम्हाला हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. बन्सल कुटुंबाच्या हत्येनंतर, इन्स्पेक्टर जतिल यादव लोभ, कपट आणि रहस्यांचं एक जाळं उघड करतो, ज्यामुळे एका जीवघेण्या कटाला जन्म मिळतो.

सस्पेन्स, थ्रीलरचा पहिल्या क्रमांकावर ट्रेंड 

'रात अकेली है...' सध्या नेटफ्लिक्सवर टॉप 10 मध्ये ट्रेंड करतेय. तसेच, 2025 मध्ये प्रदर्शित झाल्यापासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतेय. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रांगदा सिंह, राधिका आपटे, रेवती, दीप्ती नवल, ईशा अरुण, संजय कपूर आणि रजत कपूर आहेत. ज्यांनी त्यांच्या भूमिका उत्तम पद्धतीनं साकारल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा सिनेमा कोणत्याही वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'रात अकेली है: द बन्सल मर्डर्स' 19 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

Continues below advertisement

हत्येच्या रहस्यमयी कथेनं जिंकली मनं 

'रात अकेली है: द बन्सल मर्डर्स' स्मिता सिंह यांनी लिहिलंय आणि हनी त्रेहान यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला IMDb वर 6.9 रेटिंग मिळालं आहे, पण लोकांना तो आवडतोय. 'रात अकेली है' या चित्रपटाचा पहिला भाग 2020 मध्ये आला होता आणि आता 5 वर्षांनंतर 'रात अकेली है द बन्सल मर्डर्स' या दुसऱ्या पार्टनं दणका दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Avatar Box Office Collection Day 4: 'झुकेगा नहीं साला...', 'धुरंधर'चा 500 कोटींच्या फिल्मला धोबीपछाड, बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई