Neha Kakkar : बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli ) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने 12 नोव्हेंबर रोजी लग्नागाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा (Neha Kakkar ) एक व्हिडिओही व्हायरल होतोय. यामध्ये नेहा तिच्या मनातल्या भावना व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय.


हिमांश कोहलीच्या लग्नाच्या दिवशी नेहाने तिच्य सोशल मीडियावर तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाने ग्लॅमरस काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहा या व्हिडिओमध्ये 'मेरा ये दिल तेरी और बढने लगा' गाणे गुणगुणत आहे. तिचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 


व्हिडिओमध्ये नेहा कक्करचा ग्लॅमरस लूक


नेहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या आवडीच्या पेयाचा आस्वाद घेताना दिसतेय. एका टॉप फ्लोअरच्या कॅफेमध्ये दिसतेय. नेहाच्या या व्हिडीओतील लूक अनेकांच्या पसंतीसही उतरला आहे. नेह कक्कर ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. गाण्यासोबतच तिच्या डान्सचेही अनेक चाहते आहेत.




2018 मध्ये नेहा-हिमांशचे ब्रेकअप झाले


नेहा कक्कर अनेक दिवसांपासून अभिनेता हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. याचा नेहाला चांगलाच धक्का बसला. ब्रेकअपनंतर ती एकदा नॅशनल टीव्हीवर अश्रू ढाळताना दिसली होती. मात्र, हिमांशपासून वेगळे झाल्यानंतर नेहाच्या आयुष्यात गायक रोहनप्रीतची एन्ट्री झाली. दोघांनी एकत्र एक म्युझिक व्हिडिओ केला. यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.  






‘या’मुळेही चर्चेत आली नेहा कक्कर


2019 मध्ये, नेहा 4.2 अब्ज व्ह्यूजसह YouTube वर सर्वाधिक पाहिलेल्या महिला कलाकारांच्या यादीत अग्रक्रमी होती. 2021मध्ये, ती YouTube डायमंड अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय गायिका ठरली. 2017 आणि 2019मध्ये ती ‘इंडिया फोर्ब्स सेलिब्रिटी 100’मध्येही झळकली होती. डिसेंबर 2020 मध्ये, फोर्ब्सच्या आशियातील 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत तिने स्थान पटकावले होते. नेहाने 2020 मध्ये गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केले. त्यांच्या लग्न चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय बनले होते.


ही बातमी वाचा : 


Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?