Juhi Chawla Birthday: बॉलिवुडच्या टॉपच्या आणि हायेस्ट पेड अभिनेत्रींची चर्चा होते तेंव्हा आलियापासून प्रियंका, दीपिकापर्यंत नावं घेतली जातात. मात्र, बॉलिवूडच्या ९० च्या क्षेत्रात माधूरी, करिश्मापर्यंत नावांमध्ये आणखी एका नावानं बॉलिवूड गाजलं होतं. जुही चावलाचं! जुही चावलाचा आज वाढदिवस आहे. देशातील बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुहीचा समावेश होतो. विशेष म्हणजे संपत्तीच्या बाबतीत जुहीनं बॉलिवूड किंग शाहरुख खानलाही मागं टाकलं आहे!

Continues below advertisement

९० च्या दशकात करिश्मा कपूर ते माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलिवूडवर राज्य केले. यातील काही अभिनेत्री अशा आहेत की त्यांचे स्टेटस आजही कायम आहे. अनेकजण पडद्यावरून गायब झाले आहेत. आजच्या अभिनेत्रींबाबत बोलायचे झाले तर आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्री इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत आहेत. सध्या ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी मानल्या जाणाऱ्या ९० च्या दशकातली जुहीचा आज वाढदिवस आहे.  आता मोठ्या पडद्यावर फारशी सक्रिय नाही, परंतु तरीही नेट वर्थच्या बाबतीत कोणतीही आताची अभिनेत्री जुहीच्या जवळपासही नाही.

किती आहे जुही चावलाची संपत्ती?

हुरुन रिच लिस्ट २०२४ नुसार, भारतातील सर्वात श्रीमंत भारतीय अभिनेत्रींबद्दल बोललो तर जुही चावलाची संपत्ती तब्बल 4600 कोटी रुपये आहे. जी इतर कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींच्या आसपासही नाही. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूड किंग शाहरुख खानही मागे पडला आहे.! जुही चावलाचा सर्वात जवळचा मित्र शाहरुख खान याची संपत्ती ४५०० कोटी सांगितली जाते. जुहीच्या इतर समकालीन कलाकार तिच्या नेटवर्थच्या जवळपासही नाहीत.

Continues below advertisement

जुहीच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?

जुही चावलाने ९० च्या दशकात झपाटून काम करत बॉलिवूडनगरीत आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं भुरळ पाडली. जरी ती 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती, तरीही ती आता मोठ्या पडद्यावर फारशी सक्रिय नाही. ती शेवटची 2023 च्या 'द रेल्वे मॅन' मध्ये दिसली होती आणि तिचा शेवटचा हिट चित्रपट 2009 मध्ये आला होता, ज्याचे नाव 'लक बाय चान्स' होते. जुहीच्या संपत्तीचा मोठा हिस्सा तिच्या व्यावसायिक गुंतवणूकीतून येतो. जुहीची रेड चिलीज ग्रुपमध्ये हिस्सा आहे. याशिवाय शाहरुखसोबत जुहीही क्रिकेट टीमची मालकीण आहे. अभिनेत्रीकडे अनेक रिअल इस्टेट मालमत्ता देखील आहेत. तिने तिचा बिझनेसमन पती जय मेहता यांच्यासोबत इतर अनेक व्यवसायांमध्ये संयुक्तपणे गुंतवणूक केली आहे.

जुही चावलाची सिनेमाची कारकीर्द

९० च्या दशकात जुहीनं या काळातील सर्व टॉप स्टार्ससोबत काम केले. अक्षय कुमार, आमिर खानपासून शाहरुख खानपर्यंत सर्वांसोबत स्क्रीन शेअर केली. 'सुलतनत' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण, 'कयामत से कयामत तक' मधून त्याला ओळख मिळाली, त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अंदाज, साजन का घर, अंदाज अपना-अपना, आवारा, इश्क, स्वर्ग, बोल राधा बोल, हम हैं राही प्यार के, पहला नशा, येस बॉस, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.