Comedian Kunal Kamra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा नुकताच संपला आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे परदेशात उपस्थित भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्याचवेळी बर्लिनमध्ये एका मुलीने पंतप्रधानांना स्वत:च्या हाताने रेखाटलेले चित्र दाखवले. ते पाहून पंतप्रधान मोदींनी त्या मुलीचे कौतुक केले आणि ऑटोग्राफही दिला. यासोबतच एका मुलाने पंतप्रधान मोदींना देशभक्तीपर गीतही गाऊन दाखवले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. पण, याच दरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा (Comedian Kunal Kamra) याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडीओची एडिट केलेली आवृत्ती शेअर केली आहे, ज्यामुळे तो आता वादात सापडला आहे. 


कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या मुलाच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला होता. पण, कुणाल कामराने त्या मुलाचे गाणे बदलले. 'हे जन्मभूमी भारत' हे गाणे लहान मुलाने गायले होते, जे कुणालने बदलून 2010च्या 'पीपली लाइव्ह' चित्रपटातील 'महंगाई डायन खाये जाते है' केले. त्यानंतर आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सने (NCPCR) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या ट्विटवर कारवाई केल्याचे म्हटले आहे. आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्रही लिहिले आहे. 



कुणाल कामरावर कारवाई होणार?


राजकीय विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीचा वापर करणे, हे बाल न्याय कायद्याचे उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत आता कामरा यांच्या अडचणी वाढू शकतात.  मात्र, सध्या हा व्हिडीओ ट्विटरवरून हटवण्यात आला आहे.



माझ्या मुलाला राजकारणापासून दूर ठेवा!


कुणालच्या ट्विटला रिट्विट करत या लहान मुलाचे वडील गणेश पोळ यांनी लिहिले की, ‘तो माझा 7 वर्षांचा लहान मुलगा आहे, ज्याला त्याच्या प्रिय मातृभूमीसाठी गाणे गाण्याची इच्छा होती. तो अजून लहान आहे, तरी मिस्टर कामरा किंवा तुम्ही कोणीही असाल, तो नक्कीच तुमच्या देशावर जास्त प्रेम करतो. माझ्या मुलाला तुमच्या गलिच्छ राजकारणापासून दूर ठेवा.’ गणेश पोळ यांच्या या ट्विटनंतर कुणाल कामराच्या अकाऊंटवरून शेअर केला गेलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे.


हेही वाचा :


Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...


PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!


Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल