Horoscope Today, May 6, 2022 : आज चंद्र कर्क राशीत आहे. सकाळी चंद्र आद्रा नक्षत्रात राहील. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. कन्या, तूळसह अनेक राशींना आज प्रवास योग आहे, जो भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : करिअरला नवी दिशा देण्यात यश मिळेल. वाहन खरेदी करू शकता. किरकोळ व्यापाऱ्यांना लाभाचे योग आहेत, त्यांनी आपली विक्री वाढवण्याचे नियोजन करावे. व्यवसायात यश मिळेल. जवळ आणि दूरचा प्रवास देखील करावा लागू शकतो. वाढता खर्च आज तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. आज कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. व्यवसाय किंवा नोकरीत स्पर्धेचे वातावरण राहील.
वृषभ (Taurus Horoscope) : मनातील गोंधळामुळे तुम्ही कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात कोणत्याही वादात पडू नका. आरोग्याबाबत सावध राहा. पैशाची आवक वाढेल. मनःशांती मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद तुम्ही संपवू शकाल. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा.
मिथुन (Gemini Horoscope) : व्यवसायात नुकसान पाहून मानसिक चिंता वाढू शकते. मोठ्यांच्या तब्येतीबाबत निष्काळजी राहू नका. तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतून राहील. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला भेटवस्तूही मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. अतिरिक्त खर्चावर संयम ठेवा. मनातून नकारात्मक विचार काढून टाका.
कर्क (Cancer Horoscope) : गोंधळामुळे मानसिक त्रास होईल. नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक कामात वेळ खर्च होईल. वाद-भांडणापासून दूर राहा. कौटुंबिक नात्यातील अंतर मिटवण्यासाठी प्रयत्न करणे चांगले. शारीरिक कमजोरी जाणवेल. व्यवसाय मध्यम गतीने वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण करावी लागतील. काम पुढे ढकलणे चांगले नाही. व्यवसायात फायद्यासाठी अधिक गुंतवणूक टाळा, नुकसान होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo Horoscope) : सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार कराल, जे तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरेल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. द्विधा मनस्थितीमुळे, आपण आलेली संधी गमावाल. नवीन काम सुरू करू नका. व्यवसायात लाभ होईल. पैसे मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्ही नवीन कामाच्या योजना राबवू शकाल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. लांबचा किंवा जवळचा प्रवास करण्याची संधी मिळाली तर नक्कीच जा. व्यापाऱ्यांनी घाईघाईने निर्णय घेणे टाळावे, जे काही करायचे आहे ते काळजीपूर्वक विचार करूनच करावे.
तूळ (Libra Horoscope) : ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडा. व्यवसायासाठी काही योजना बनवण्याची तयारी करत असाल, तर त्या योजनांना चालना मिळेल. नशीब तुमची साथ देईल. तुम्ही धार्मिक राहाल. प्रवासात लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. व्यवसाय किंवा नोकरीत सहकाऱ्यांची साथ कमी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : नवीन काम सुरू करू नका आणि रागावर संयम ठेवा. कोणत्याही चुकीच्या कामापासून दूर राहा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सरकारी कामे काळजीपूर्वक करा. व्यवसायात यश मिळू शकतो. पैशाची आवक वाढेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक गुंतवणूक करू नका. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील.
धनु (Sagittarius Horoscope) : पार्टी, पिकनिक, प्रवास, स्वादिष्ट भोजन आणि खरेदी हा आजच्या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग असेल. नोकरीत दिवस प्रगतीचा आहे. वाणीवर नियंत्रण ठेवावे. जीवनसाथीचा सहवास मिळेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. व्यवसाय आणि आरोग्याची स्थिती चांगली राहील. कोणतेही काम करण्यात दिरंगाई करण्याची गरज नाही.
मकर (Capricorn Horoscope) : अधिक पैसे मिळवण्यासाठी व्यावसायिकांनी पैसे गुंतवणे टाळावे. कुटुंबतील सदस्याला दिलेले वचन पूर्ण कराल. पैशाशी संबंधित काही समस्या असतील, तर त्या आज दूर होतील. शत्रूंवर विजय मिळवाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. प्रवासाचीही शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ जाईल.
कुंभ (Aquarius Horoscope) : वैचारिकदृष्ट्या खूप चिंताग्रस्त असल्याने कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेणे हिताचे ठरेल. प्रवासात त्रास होऊ शकतो. व्यवसायातील वादांपासून स्वतःला दूर ठेवा. जास्त कामामुळे तणाव येऊ देऊ नका. प्रेमात मतभेद होऊ शकतात. भावनेच्या आहारी जाऊन आज कोणताही निर्णय घेऊ नका. लाभाच्या काही नवीन संधी मिळतील. आळस दूर करा आणि उच्च अधिकाऱ्यांच्या सहवासात राहा.
मीन (Pisces Horoscope) : कठीण कामातही तुम्हाला यश मिळेल, तुमचे काम नीट करा. प्रगतीच्या मार्गात काही अवास्तव अडथळे येऊ शकतात. एखादी नवीन योजना सुरू करू शकता, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही खर्च वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर ओझे येऊ शकते. खर्चाचा अतिरेक करू नका. धार्मिक प्रवासात आनंद होईल. मित्रांसोबत वाद होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :