मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतरपासून ड्रग्जचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्याने रिया चक्रवर्तीने अमली पदार्थांचं सेवन करणार्या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे सांगितली आहेत. या अभिनेत्रीची एनसीबी चौकशी करणार आहे. यामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंग यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
दरम्यान रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला की, ड्रग्स प्रकरणात रियाने कोणत्याही अभिनेत्रींची नावं घेतली नाहीत. एनसीबीचे सर्व दावे खोटे आहेत. रियाने आपल्या जबाबाद कोणाचंही नाव घेतलेले नाही. जर एनसीबी किंवा अन्य कुणी रियाचा जबाब सार्वजनिक करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत या व्यतिरिक्त कोणाचंही नाव घेतलं नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सतीश मनाशिंदे पुढे म्हणतात की 'जया साहाची सुशांत आणि रिया यांच्याशी चॅट फक्त सीबीडी ऑईल पाठवायची याबाबत झाले होते. ते कोणतंही ड्रग नाही. आपण सीबीडी बाटली पाहू शकता, त्यात ड्रग्स संबंधित काहीही नाही.
जया सहाची एनसीबीकडून चौकशी; अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंग आणि सारा अली खान यांच्यासह अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर व्हावे लागणार आहे. येत्या तीन दिवसात या अभिनेत्रींना आपला जबाब एनसीबी समोर नोंदवायचा आहे.
दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.
संबंधित बातम्या
- ड्रग्ज प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण
- ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठं नाव समोर! NCB च्या सूत्रांकडून दीपिका पादुकोण हिच्या नावाला दुजोरा
- SSR Case | रियाच्या कबुली जबाबमुळे सारा अली खान, श्रद्धा कपूरच्या अडचणीत वाढ