नवी दिल्ली : फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया यांच्यासोबत चर्चा केली. या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये मॉडेल, रनर आणि अभिनेत्रा मिलिंद सोमण, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर हेदेखील सहभागी झाले होते. सर्वांनी फिटनेसबाबत आपला प्रवास आणि पंतप्रधानांच्या निरोगी जीवनातील गुणांबद्दल आपली मतं मांडली आणि काही सूचनाही दिल्या.
यादरम्यान सर्वात आधी देवेंद्र झाझरियासोबत पंतप्रधानांनी संवाद साधला. देवेंद्रने सांगितलं की, त्याने आपल्या खांद्याला झालेल्या दुखापतीला एक्सरसाइजच्या मदतीने ठिक केलं. देवेंद्र म्हणाला की, 'जेव्हा मला खांद्याला दुखापत झाली होती, तेव्हा मी ठरवलं होतं की, या दुखापतीला मी हरवणार आहे. ही दुखापत ठिक करायची आहे.' तसेच खांद्यासाठी अनेक प्रकारच्या एक्सरसाइज करत असल्याचंगही त्याने सांगितलं.
तुमचं तर नाव आणि काम दोन्ही विराट : पंतप्रधान मोदी
फिट इंडिया मोहीमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रचंड प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी कोहलीला म्हणाले की, 'तुमचं तर नाव आणि काम दोन्हीही विराट आहे. तसेच कोहलीला त्याच्या फिटनेस रूटिनबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याबाबत उत्तर देताना कोहली म्हणाला की, 'फिट इंडिया मोहिमेचा फायदा सर्वांनाच होत आहे. खेळाची गरज फार वेगाने बदलत आहे आणि आपण त्यांना पूर्ण करू शकत नव्हतो. आपण त्या फिटनेसमुळे फार मागे पडलो होतो. त्यामुळे मला वाटतं की, फिटनेसचं प्राथमिकता असली पाहिजे. आज फिटनेस सेशन मिस झाल्यामुळे वाईट वाटतं.'
मिलिंद सोमणला वय विचारत, मोदींनी केली गंमत
पंतप्रधान मोदींनी अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणच्या वयावरून गंमत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मिलिंद, मला तुम्हाला विचारायचं आहे की, तुमचं वय जे ऑनलाइन दाखवलं जातं, ते खरंच आहे का?' यावर मिलिंद आणि मोदी दोघेही हसू लागले. त्यानंतर मिलिंदने सांगितलं की, 'मला अनेक लोक विचारतात की, तुमचं वय खरचं 55 आहे का? पण जेव्हा मी माझ्या पूर्वजांना पाहतो, की ते 100 किलोमीटर चालत असते. ज्यामध्ये महिलाही 3 किमी सुरुवात करतात. मी खरचं फिट इंडिया मोहिमेचं कौतुक करतो.'
मिलिंद सोमणच्या आईलाही मोदींचा सलाम, पंतप्रधान म्हणाले - 4 वेळा पाहिला त्यांचा व्हिडीओ
मिलिंद सोमण म्हणाले की, आईचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये ती पुशअप करताना दिसून आली होती. यावर बोलताना मोदी म्हणाले की, 'मी 4 वेळा तो व्हिडीओ पाहिला. त्यांना माधा विशेष प्रणाम आहे.' मिलिंद यावर बोलताना म्हणाले की, 'आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो. त्यांनी त्याचसोबत सांगितलं की, ते शूज न वापरताच धावतात.
पंतप्रधानांची आई विचारते - हळदीचा आहारात समावेश करता की, नाही?
पंतप्रधान मोदींनी प्रसिद्धा आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्यासोबतही बातचीत केली. त्यावेळी मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात आपल्या आईशी 2 ते 3 वेळा बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ते म्हणाले की, फोन केल्यावर आई नेहमी विचारते हळद घेतोस की नाही