मुंबई : 'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच आता या चित्रपटाच्या शुटींगचा एक व्हिडिओ दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgoankar) यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये सचिन पिळगावकर यांच्यासह अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgoankar),  स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi), हेमल इंगळे (Hemal Ingle), अली सागर (Ali Sagar) हे देखील पाहायला मिळत आहे.


सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. तसेच आता नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. 






'नवरा माझा नवसाचा 2'च्या शूटिंगला सुरुवात


'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"नवरा माझा नवसाचा 2' शूटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या". 


नवरा माझा नवसाचा सिनेमाबद्दल 


'नवरा माझा नवसाचा' हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या विनोदी सिनेमाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सिनेमात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर (Sachin Pilgaonkar), अशोक सराफ (Ashok Saraf), सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे आता हा सिनेमा कधी रिलीज होणार? या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार? या सिनेमाचं कथानक काय असेल? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सचिन पिळगावकर या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.


ही बातमी वाचा : 


Navra Mazha Navsacha 2 : अशोक सराफसह सचिन पिळगावकर पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज, लवकरच येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग