February 2024 Shubh Muhurat:  ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याला अतिशय महत्त्वाच आहे. उद्यापासून माघ महिना सुरू होत आहे. गणेश जयंती, माघ पौर्णिमा, प्रदोष, संकष्टी चतुर्थी आहे. फेब्रुवारी महिना पूजा पाठ आणि होम हवन करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात 18 शुभ मुहूर्त आहेत.


या महिन्यात चार मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. ग्रहांच्या परिवर्तनामुळे  त्यांची चाल देखील बदलणार आहे. ग्रहांचे परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींना अनिष्ठ फळ देणारे असणार आहे. या ग्रह परिवर्तनामुळे अनेक राशीच्या समस्या वाढणार आहेत.


फेब्रुवारी महिन्यात येणारे व्रत आणि सण


14 फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे आणि 16 फेब्रुवारीला रथ सप्तमी आहे.तर 20 फेब्रुवारीला जया एकादशी आणि 21 फेब्रुवारीला भीष्मद्वादशी असणार आहे. तर लगेच 22 फेब्रुवारीला गुरुपुष्यअमृत योग असणार आहे. 


फेब्रुवारी महिन्यातील साखरपुडा मुहूर्त : 


12,13,14,17,18,19,24,26,27,28,29


फेब्रुवारी महिन्यातील विवाह  मुहूर्त :


12,13,17,18,24,26,27,28,29


फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी एकूण 11 शुभ मुहूर्त


हिंदू धर्मात शुभ मुहूर्ताशिवाय कोणतेही शुभ कार्य होत नाही. अशात विवाहासाठी शुभ मुहूर्त पाळणे अनिवार्य मानले जाते. मंगल कार्यासाठी शुभ काळ अत्यंत विशेष मानला जातो. असे मानले जाते की, यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते, देवी-देवता आणि नऊ ग्रहांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनात सुख-शांती राहते. लग्नासाठी शुक्र आणि गुरूचा उदय होणे फार महत्वाचे आहे. फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी एकूण 11 शुभ मुहूर्त आहेत 


फेब्रुवारी 2024 चा शुभ काळ


फेब्रुवारी मुंडन मुहूर्त - 21, 22, 29 फेब्रुवारीमधील सर्वोत्तम दिवस असतील.
फेब्रुवारी नामकरण मुहूर्त - 01, 02, 04, 08, 11, 14, 18, 21, 22, 25, 26, 29 फेब्रुवारी.
फेब्रुवारी अन्नप्राशन मुहूर्त - 2, 8, 12, 14, 19, 21, 22, 26, 29 फेब्रुवारी.
फेब्रुवारी कर्णवेध मुहूर्त - 1, 10, 14, 15, 18, 19, 21, 22, 29 फेब्रुवारी.


शुभ कार्यासाठी फेब्रुवारी अतिशय शुभ


फेब्रुवारी 2024 मध्ये 16 दिवस शुभ योग तयार होत आहेत.  फेब्रवारीत गुरुपुष्य योग तयार होणार आहे. गुरुपुष्य योगात सोने, घर, वाहन खरेदी करणे, नवीन कार्याचा शुभारंभ करणे इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि फलदायी मानल्या जातात.  जर कोणतेही शुभ कार्य करायचा असेल फेब्रुवारी अतिशय शुभ महिना असणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Weekly Horoscope 12 to 18 February : 12 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या राशीला मिळणार यश तर दोन राशींना बसणार मोठा फटका, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य