मुंबई :'समझनेवालों को इशारा काफी होता है, आता सगळेच गप्प आहे. सगळे घाबरलेले आहेत. आता पुढचं वक्तव्य ती कुणाविरोधात करेल याचा काही नेम उरलेला नाही. आपल्या प्रत्येक वक्तव्यासोबत तिला बळच येऊ लागलं आहे. असं चालणार नाही. आता ती म्हणतेय, करण जोहरची पद्मश्री काढून घ्या. बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?', असा थेट सवाल ज्येष्ठ चतुरस्र अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला आहे.


कंगना रणौतचं नाव न घेता नसिरुद्दीन शाह यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते म्हणाले, सुशांतवर जर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. त्याची एक प्रोसेस असते. ती सिस्टिम त्यांचं काम करत आहे. अशावेळी प्रत्येकवेळी आपण त्यात पडलंच पाहिजे असं नाही. कुणाची पद्मश्री काढून घ्यायची आणि कुणाची नाही, हे तिला सांगण्याचा अधिकार नाही. उलट आपल्यापैकी एकात तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे, याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत. असंही शाह म्हणाले. यावर कंगनाचे अद्याप उत्तर आलेलं नाही. पण नसिरुद्दीन शाह यांनी पहिल्यांदा टिप्पणी केल्यावर मात्र कंगनाने नसीर यांचं कौतुक केलं होतं. इतक्या महान अभिनेत्याच्या शिव्याही आशीर्वादासारख्या असतात असं तिच्या टीमने ट्विट केलं होतं.

कंगनाच्या वक्तव्यामुळे तिची आई मात्र काळजीत, आईचं मृत्युंजयाला साकडं

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने आपल्या भात्यातून एकेक बाण काढून अनेक कलाकार, दिग्दर्शकांवर तो साधला आहे. यात करण जोहर, जावेद अख्तर, आदित्य चोप्रा, सलमान खान, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, महेश भट्ट, अलिया भट्ट आदींचा समावेश होतो. प्रत्येकवेळी तिने स्टेटमेंट केलं की माध्यमांनी त्या स्टेटमेंटला उचलून धरलं आहे. त्यामुळे कंगना आता काय बोलेल याची शाश्वती इंडस्ट्रीला राहिलेली नाही. अनेक लोक घाबरले आहेत. आता पुढचं नाव ती आपलं घेईल का असंही अनेकांना वाटतं आहे. त्यामुळे कुणीच तिच्या वक्तव्यांवर फार काही बोलत नासलेलं दिसतं. अशावेळी नसिरुद्दीन शाह यांची आलेली टिप्पणी बरंच काही सांगून जाणारी आहे.

संबंधित बातम्या