मुंबई : कंगना रणौत नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना अधिक मोकळेपणाने बोलू लागली. तिने थेट बॉलिवूडच्या बड्या लोकांची नावं घ्यायला सुरूवात केली. तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. शिवाय ती आपल्या ट्विटर अकाउंटवरूनही बोलत असते. हे अकाऊंट तिची टीम चालवते. शिवाय, ते व्हेरिफाईडही नाही. सध्या तरी ट्विटरवर ती याच अकाऊंटद्वारे बोलत असते. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात येणारी वेगवेगळी वळणं पाहता आता कंगना थेट आरोप करू लागली आहेच. तिच्या या वक्तव्यांमुळे तिच्या कुटुंबियांना मात्र वेगळीच धास्ती वाटू लागली आहे.


कंगना कुठेही काही बोलते आणि अशाने तिच्या जिवीताला धोका निर्माण होईल की काय असं तिच्या आईला वाटू लागलं. म्हणूनच तिच्या आईने थेट महामृत्यूंजय मंत्राचं पठण सुरू केलं. तब्बल 1 लाख 15 हजाार वेळा हा मृत्यूंजम मंत्र कंगनाच्या आईने म्हणून त्यानंतर कंगनाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. याचा एक व्हिडिओ कंगनाने आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यात कंगना म्हणते, माताजी मेरी सुरक्षा के विषय मे चिंतीत रहती है, इसलिये उन्होने 1 लाख 15 हजार महामृत्यूंजय जाप करवाए. यह कार्यक्रम आज समाप्त हुआ. मै अपने समस्त परिवार की धन्यवाद करती हू. हर हर महादेव. काशिविश्वेश्वर महाराज की जय.


कंगनाने नेहमीच आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. आदित्य पांचोली, ह्रतिक रोशन, जावेद अख्तर, सलमान खान, आदित्य चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, अलिया भट, महेश भट आदी अनेकांना तिने वादात ओढलं आहे. यापैकी काही अपवाद वगळात फार तिच्या कोणी नादाला लागलेलं नाही. पण तिच्या या वक्तव्यामुळे तिची आई मात्र काळजीत पडली आहे. हे यातून स्पष्ट होतं.





संबंधित बातम्या