Jhund Box Office Collection : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'झुंड' (Jhund) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची कथा आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपटाची कमाई संथ गतीने सुरू झाली. पण, वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनने मोठी झेप घेतली होती. त्याचवेळी, आता आठवड्याच्या मध्यावरही हा चित्रपट चांगले कलेक्शन करत आहे.


अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' हा चित्रपट दररोज 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे. मंगळवारी या चित्रपटाने 1.30 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी, सहाव्या आणि सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी-गुरुवारी या चित्रपटाने जवळपास तितकीच कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई आता 12 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. 


बॉक्स ऑफिसवर स्थान कायम!


अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.50 कोटींचे कलेक्शन केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये चांगलीच झेप घेतली. चित्रपटाने आणखी 2.10 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 2.90 कोटी आणि चौथ्या दिवशी 1.20 कोटी कमावले. यानंतर मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी 1.30 कोटींचे कलेक्शन झाले.



अमिताभ बच्चन यांनी साकारलेले विजय बारसे कोण?


अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे म्हणून वेगळी छाप सोडली आहे. 'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावरुन हा चित्रपट प्रेरित आहे. विजय बारसे यांनी त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल हा ग्लोबल खेळ लोकप्रिय केला आणि त्यांना खेळण्याची हिंमत देऊन त्यांचे जीवन समृद्ध केले.


दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी 'झुंड'ची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. इतकंच नाही, तर ते या चित्रपटातही अभिनय करताना दिसले आहेत. 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'झुंड' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'झुंड'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीताची धुरा सांभाळली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha