Kartik Aaryan : काही बॉलिवूड अभिनेते सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असतात. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यननं (Kartik Aaryan) त्याच्या एका छोट्या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही चाहती त्याच्या धमाका (Dhamaka) या चित्रपटातील डायलॉग म्हणता दिसत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. कार्तिकच्या एका चाहतीनं त्याच्या या व्हिडीओला केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

कार्तिकच्या एका चाहतीनं त्याच्या या व्हिडीओला कमेंट केली, 'माझ्यासोबत लग्न कर मी तुला 20 कोटी देईल.' तिच्या या कमेंटवर कार्तिकनं मजेशिर रिप्लाय दिला आहे. कार्तिकनं त्याच्या फॅनने केलेल्या कमेंटला उत्तर दिले, 'लग्नाची बोलणी कधी करायची?' कार्तिक आर्यनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्यार का पंचनामा सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

लवकरच कार्तिकचा भूल भूलैया- 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच शहजादा या चित्रपटाचं शूटिंग कार्तिकनं नुकतच पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग दिल्लीमध्ये पूर्ण केलं. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha