The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.


'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, ‘प्रिय अनुराग ठाकूर जी, जर 'राईट टू जस्टिस'वरचा चित्रपट लोकशाहीत राज्यात आडवा येत असेल, तर आम्ही न्यायाचा काय विचार करावा?’


पाहा पोस्ट :



याशिवाय विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत लिहिले की, 'प्रिय अशोक गेहलोत जी, दहशतवाद्यांची एकच ताकद आहे की, ते भीती निर्माण करतात आणि आम्ही घाबरतो'. 'द कश्मीर फाइल्स'च्या प्रेक्षकांना संबोधित करताना दिग्दर्शकाने लिहिले की, 'तुम्हाला न्याय देण्याची वेळ आली आहे.'


...म्हणून कलम 144 लागू!


कोटामध्ये कलम 144 लागू करण्यामागील कारण सांगताना, कार्यवाह जिल्हाधिकारी सांगतात की, येत्या काही दिवसांत चेटीचंद, महावीर जयंती, गुड फ्रायडे, जुमातुल विडा, बैसाखी असे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सण येणार आहेत. यासोबतच विवेक अग्निहोत्रींच्या 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे थिएटर प्रदर्शन लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखणे अत्यंत आवश्यक आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha