Nandurbar: सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. नंदूरबारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात घसरण झालीय. घरातून बाहेर पडताच हात पााय सुन्न पडत असून सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरल्याने नागरिक कुडकुडले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डाब परिसर कडाक्याच्या थंडीने गारठला.वाहनांच्या टपांवर व गवतावर हिम चादर पसल्याचे दिसून आले.या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास सपाटीपेक्षा सुमारे तीन ते चार अंशने तापमानात घट होते.मात्र, डाब परिसरात 4 ते 5 अंशादरम्यान तापमान असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे हेला दाब म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या डाब परिसरातील गावपाड्यांमध्ये हिवाळ्यातील तापमान कमालीचे कमी होऊन प्रचंड थंडी जाणवते, पाणी गोठून बर्फ होतो. घराबाहेर लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांवरही हिम साचलेला दिसून येतो. तसेच माठातील पाणी गोठले जाते. सातपुड्यातील या डाब परिसराला अक्कलकुवा तालुक्यातील कुल्लू मनाली म्हणून ओळखले जाते.
शेतांमध्ये बर्फाची पांढरी चादर!
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढत असल्याने काल रात्री डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर व गवतावर हिमकण साचलेले दिसून आले.कडाक्याच्या थंडीनं सातपुड्यात नागरिकांच्या जननीवनावर परिणाम झाल आहे. दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.
येत्या दोन दिवसात तापमान घटणार
राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचा हवामान विभागांना सांगितलं . उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .
जळगावात निचांकी तापमानाची नोंद
उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठलाय . किमान तापमानात कमालीची घट झाली असून मंगळवारी (10 Dec) जळगावात नीचांकी 8 अंशांची नोंद करण्यात आली . तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश होते उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानात घसरण झाली. नंदूरबारच्या अक्कलकुवा, डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात तापमान इतके कमी झाले होते की दवबिंदू गोठून घरांवर हिमकणांची चादर पसरली होती.