Myra Vaikul : झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tuzi Reshimgath) या मालिकेतून परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ ( Myra Vaikul) ही घरोघरी पोहचली. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. आता ही छोटी परी मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झालीये. आगामी मराठी सिनेमात मायरा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी 'नाच गं घुमा' (Naach G Ghuma) या चित्रपटाची घोषणा झाली. याच चित्रपटामध्ये मायरा झळकणार आहे. 


नाच गं घुमा या चित्रपटाच्या सहनिर्मित्याची भूमिका स्वप्नील जोशीने निभावली आहे. तसेच परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्त्रीप्रधान मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. नुकतच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचं चित्रपटाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी सांगितलं होतं. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असणार आहेत. 


छोटी परी पोहचली घराघरात


माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे मायरा वायकुळला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं परी ही भूमिका साकारली होती. मायराचा चाहता वर्ग मोठा आहे. तिला इन्टाग्रामवर 561K एवढे फॉलोवर्स आहेत. मायरा ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. तसेच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मायराने एन्ट्री केली होती. तसेच तिनं लर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. या मालिकेत ती अभिनेत्री  स्नेहा वाघबरोबर झळकली होती. आता मायरा मोठा पडदा गाजवायला सज्ज झालीये. 


'नाच गं घुमा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Naach G Ghuma)


परेश मोकाशी दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशी निर्मित नाच गं घुमा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते', असं एक मोशन या चित्रपटाचं नुकतचं शेअर करण्यात आलं आहे.   या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हीनं सांगितलं होतं. त्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोघीही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कामावर जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घरात कामाला येणाऱ्या बाईचं फार महत्त्व असतं. तीच गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. 


ही बातमी वाचा : 


 Marathi Movies : दिवस महिला दिनाचा, मुहूर्त स्त्रीप्रधान चित्रपट घोषणेचा; मोठ्या पडद्यावर साजरा होणार स्त्रीत्वाचा सोहळा