मुंबई : अभिनेता आणि लेखक जीशान कादरीविरुद्ध मुंबई पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका निर्मात्याने जीशान कादरीविरुद्ध तक्रार केली आहे. जीशान कादरी यांनी वेब सीरीज करण्यासाठी 1.5 कोटी घेतले असून वेब सीरीज बनवली नाही, असे निर्मात्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continues below advertisement


जीशान यांच्या विरोधात मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीशान यांची Friday to Friday नावाची कंपनी आहे. या कंपनीवरचं 1.5 कोटी रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जीशान यांच्या महिला सहकाऱ्यावर देखील आरोप करण्यात आले आहे. परंतु एफआयआरमध्ये फक्त जीशान यांचं नाव आहे. जीशान कादरी यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जीशान बिच्छू का खेल या वेब सीरीजमध्ये दिसले होते.