Mulgi Jhali Ho : 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेतून किरण माने यांना वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्याने रातोरात बाहेर काढून टाकण्यात आलं होतं. मालिकेतून बाहेर काढल्यामुळे सध्या किरण माने सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. तर मालिकेच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, मालिकेतील महिला सहकलाकारांसोबत ते गैरवर्तवणुक करायचे आणि अपशब्द वापरायचे, यासाठी किरण यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. पण तरीही त्यांच्यात बदल झाला नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. परंतु आता मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे.


'मुलगी झाली हो' या मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. अद्याप प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याआधी 'रुद्रम' मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील महत्वाची भूमिका साकारली आहे.





किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मालिकेचं एक नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. ज्यात किरण माने यांना वगळण्यात आले होते. किरण यांनी साकारलेल्या विलास पाटीलच्या भूमिकेसाठी त्यांचं नेहमीच कौतुक होत असे. परंतु आता आनंद अलकुंटे विलास पाटीलच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील का, तसंच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतील का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


संबंधित बातम्या


'नार्को क्वीन' शशिकला पाटणकरांच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज, समित कक्कड सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!


Panghrun Movie : अखेर प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पांघरूण'


Fardeen Khan Corona Positive : फरदीन खानला कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha