मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर पुष्पा-2 या चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले पैसे कमवतोय. आता मात्र या चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसतेय. कारण आता 'मुफासा-द लॉयन किंग' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. बॉलिवूडचा बादशाहा म्हणून ओळख असलेला शाहरुख खान तसेच त्याची मुलं आर्यन आणि अबराम खान यांचा आवाज असलेल्या या अॅनिमेशनपटाला लोकांची चांगलीच पसंदी मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुफासा-द लॉयन किंग या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण 8.5–9 कोटी रुपये कमावले आहेत.


शहरूख खान तसेच आर्यन खान आणि अबराम खान यांचा आवाज


 द लॉयन किंग हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता. 'मुफासा -द लॉयन किंग' हा चित्रपट 'द लॉयन किंग' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. द लॉयन किंग या चित्रपटाला तेव्हा लोकांनी चांगलेच पसंद केले होते. आता मुफासा द लॉयन किंग हा चित्रपटही लोकांना आवडत असल्याचे दिसतेय. कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने साधारण 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी देशभरातली तसेच इतर देशांतही प्रदर्शित करण्यात आला आहे. मुफासा द लॉयन किंग या चित्रपटात शहरूख खान तसेच आर्यन खान आणि अबराम खान यांचा आवाज असल्यामुळे सिनेरसिक या चित्रपटाला गर्दी करत आहेत.   


शाहरुख खानसोबतच संजय मिश्रा, श्रेयस तळपदे यांनीदेखील या चित्रपटात आवाज दिला आहे. तर तेलुगु भाषेतील डबिंगसाठी सुपरस्टार महेश बाबूने या चित्रपटाला आवाज दिला आहे.  


Video :




अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती रुपये कमवले?


मुफासा द लॉयन किंग’ या चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाचे देशभरात एकूण 65,000 तिकीट विकले होते. यातील 35 हजार तिकीट पहिल्या दिवशाच्या शोचे होते. त्यामुळे आता पुष्पाची क्रेझ ओसरत असून सिनेरसिक मुफासा हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसतंय. या चित्रपटात आर्यन खानने व्हॉईस ओव्हर देऊन एका प्रकारे सिनेसृष्टीत पदार्पण केल्याचं म्हटलं जातंय. अबराम खाननेही या चित्रपटाला आवाज दिला आहे. लहान मुफासासाठी  अबरामचा आवाज वापरण्यात आला आहे.  


हेही वाचा :


Oscar 2025 : मराठी अभिनेत्याच्या लघुपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान, 'अनुजा' सिनेमाच्या यशावर नागेश भोसले भावना व्यक्त करत म्हणाले...


Taapsee Pannu Pics: अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!


Shraddha Kapoor : श्रद्धाचा ग्लॅम लूक; मल्टिकलर ड्रेसमध्ये दिसतेय हॉट!