Shraddha Kapoor : श्रद्धाचा ग्लॅम लूक; मल्टिकलर ड्रेसमध्ये दिसतेय हॉट!
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला चित्रपटसृष्टीत येऊन १४ वर्षे झाली असून या सर्व वर्षांत श्रद्धाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, तिची खरी ओळख 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटातून झाली.
श्रद्धा कपूरने 2010 मध्ये आलेल्या 'तीन पत्ती' या सिनेमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
या चित्रपटात अमिताभ बच्चन, बेन किंग्सले, आर. माधवन, रायमा सेनसारखे कलाकार दिसले. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अनेक हॉलीवूड कलाकारांसह हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते.
या खास लूकसाठी श्रद्धाने मल्टी कलर समावेश असलेला गाऊन परिधान केला आहे.
या लूकसाठी श्रद्धाने कोणतीच ज्वेलरी घातली नाही.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'छिछोरे', 'स्त्री' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि पात्रांसाठी ओळखली जाते.