Mufasa The Lion King Box Office Collection Day 2: बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित लायन किंग फिल्म युनिव्हर्सचा सिक्वेल असलेला 'मुफासा: द लायन किंग' (Mufasa The Lion King ) हा चित्रपट 'वनवास' सोबत 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुसाफाची ही कहाणी सध्या प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत असल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. त्यामुळेच पुष्पा 2 (Pushpa 2) आणि वनवास सारखे दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपट असूनही पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली सुरुवात केली.
चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. या आकड्यांवरुन हा सिनेमा भारतात चांगली कमाई करेल असं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. Sacknilkच्या वृत्तानुसार, मुसाफाने भारतात पहिल्या दिवशी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये 8.8 कोटी रुपयांची कमाई केली.दुसऱ्या दिवशी रात्री 10.15 वाजेपर्यंत चित्रपटाने 13.54 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 22.34 कोटी रुपये झाले आहे.
वनवासला टाकलं मागे, पुष्पा 2 सोबत शर्यत
गदर आणि गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्यासोबत वनवास बनवला आहे, जो मुफासासोबत रिलीज झाला आहे. वनवासची ओपनिंग फक्त 60 लाख रुपये होती, तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची कमाई जेमतेम 1 कोटींवर पोहोचली. तर हॉलिवूड चित्रपट 'मुफासा'ने यापेक्षा कितीतरी अधिक कमाई केली आहे.पुष्पा 2 ने 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अजूनही सिनेमागृहांत हा चित्रपट आहे. एवढ्या मोठ्या ब्लॉकबस्टरसमोरही मुफासाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. दोघांच्या रोजच्या कमाईत फक्त थोडा फरक आहे.
शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुलं अबराम खान आणि आर्यन खान यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांना आपला आवाज दिला आहे. शाहरुखने मुफासाला आवाज दिला आहे आणि अबराम खानने कब मुफासाला आवाज दिला आहे. मुफासाचा मुलगा सिम्बाचा आवाज बनून मुलगा आर्यनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.