Libra Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, डिसेंबर महिन्यातला तिसरा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा तूळ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. कठीण प्रसंगातही संयम ठेवा. हट्टी असण्याने नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही चुकत असाल तर माफी मागायला अजिबात संकोच करू नका. अविवाहितांचं लग्न आठवड्याच्या शेवटपर्यंत ठरू शकतं. काही जण जुन्या प्रेमाकडे परत जाऊ शकतात.
तूळ राशीचे करिअर (Libra Career Horoscope)
हा आठवडा फलदायी राहील. व्यवस्थापक आणि व्यवस्थापन तुमच्या कामावर खूश होतील. कोणतंही काम नाकारू नका. यामुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. ज्यांची मुलाखत आहे त्यांना या आठवड्यात मुलाखतीत कोणत्याही अडचणीविना यश मिळेल. आयटी, हेल्थकेअर, अॅनिमेशन, आर्किटेक्चर आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील व्यावसायिकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तूळ राशीच्या काही लोकांनी न घाबरता नवीन कल्पना घेऊन व्यवसाय सुरू करावा. मात्र, आठवड्याचे सुरुवातीचे दिवस नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी चांगले नाहीत.
तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला मालमत्ता खरेदी-विक्रीत यश मिळेल. तूळ राशीच्या काही लोकांना फ्रीलान्सिंगमधून पैसे मिळतील. उत्पन्नही बाढू शकतं. शेअर बाजार, व्यापार किंवा जोखमीच्या व्यवसायात तुम्ही हुशारीने गुंतवणूक करू शकता. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. त्याच वेळी, काही ज्येष्ठ त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित करू शकतात.
तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)
सकारात्मक विचार ठेवा, ऑफिसचा ताण घरी आणू नका. सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी राहण्यासाठी योगा किंवा जिम सेशनमध्ये सहभागी होऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ समस्या येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: