Movies Based On Real Crime: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओटीटीवर आपल्याला आवडेल तो चित्रपट, आपल्या वेळेनुसार पाहायला मिळतो. रोमान्स, थ्रिलर, हॉरर, कॉमेडी, सर्व प्रकारचे चित्रपट आणि मालिका OTT वर उपलब्ध आहेत.
मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे सत्य घटनांवर आधारित आहेत. मग तो विक्रांत मॅसीचा 'सेक्टर 36' असो किंवा इरफान खानचा 'तलवार' असो. या चित्रपटांत घडलेला गुन्हा आणि त्यामागील सत्य घटना पडद्यवर पाहताना अंगावर शहारे येतात.
सेक्टर 36 (Sector 36)
आदित्य निंबाळकर दिग्दर्शित विक्रांत मेस्सी अभिनीत चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. यातील अभिनेत्याचा अभिनय पाहिल्यानंतर सर्वांनी त्याचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट 2006 मध्ये नोएडाच्या सेक्टर 31 मधील निठारी गावात घडलेल्या खऱ्या हत्याकांडावर आधारित आहे, ज्यामध्ये एका सायको किलरनं 24 हून अधिक मुलांची हत्या केल्याची सत्य घटना रुपरी पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
तलवार (Talwar)
इरफान खान आणि कोंकणा सेन शर्मा अभिनीत हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं होतं. हा सिनेमा 2008 मध्ये नोएडामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडावर आधारित आहे. या भीषण हत्येनं संपूर्ण देश हादरला होता.सस्पेन्स वाढवणारा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर पाहता येईल.
नो वन किल्ड जेसिका (No One Killed Jessica)
राणी मुखर्जी आणि विद्या बालन स्टारर चित्रपट 'नो वन किल्ड जेसिका' 2011 साली रिलीज झाला होता, जो त्यावेळी लोकांना खूप आवडला होता. या क्राईम ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले होते. हा थ्रिलर मॉडेल जेसिका लालची खरी कहाणी सांगते, जिची एका रेस्टॉरंटमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येईल.
दिल्ली क्राईम (Delhi Crime)
दिल्ली क्राईम ही वेब सिरीज असून तिचे आतापर्यंत दोन भाग झाले आहेत. या मालिकेच्या पहिल्या भागात दिल्लीत घडलेल्या निर्भया घटनेची पटकथा दाखवण्यात आली आहे. ही मालिका OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येईल.
रमन राघव 2.0 (Raman Raghav 2.0)
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विकी कौशल अभिनीत हा चित्रपट देखील एका खऱ्या सायको किलरवर आधारित आहे, जो OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :