Veronica Horror Movie: हॉरर मूव्ही (Horror Movie) पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. अनेकांना भिती वाटते पण, तरिसुद्धा हॉरर मूव्ही पाहण्याची हौस काही सुटत नाही. हॉरर चित्रपट म्हटलं की, सगळ्यांच्या उड्या पडतात. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत असे अनेक चित्रपट आहेत, जे पाहिल्यानंतर धडकी भरते. भितीनं रात्रभर झोप येत नाही. जर तुम्हालाही एखादा हॉरर चित्रपट पाहायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला इतका घाबरवेल की, तुमची रात्रीची झोप नक्कीच उडेल.
वेरोनिका चित्रपटाबाबत थोडसं...
हॉरर चित्रपटाच्या शोधात असाल तर, तुम्ही 'वेरोनिका' पाहू शकता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. वेरोनिका हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील पाहू शकता. हा चित्रपट पाहिल्यानंतर बेट लावून सांगतो, तुम्हाला रात्री झोप येणार नाही. जर तुम् खरंच खूप घाबरत असाल तर हा चित्रपट पाहू नका, असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ.
स्पॅनिश चित्रपट वेरोनिका 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 1991, मॅड्रिडवर आधारित आहे. वेरोनिका चित्रपटाची कथा एका टीनएज मुलीची आहे, जिचे आई-वडील तिला तिच्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी घरी सोडतात. पण मग घरात काही विचित्र घटना घडू लागतात. यानंतर या चित्रपटात अशी अनेक भयानक दृश्य आहेत, जी पाहिल्यानंतर तुम्हाला रात्री अजिबात झोप येणार नाही.
चित्रपटाचं रेटिंग किती?
वेरोनिका एक सुपर हॉरर चित्रपट आहे, ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन पॅको प्लाझानं (Paco Plaza) नं केलं आहे. या चित्रपटात तुम्हाला सँड्रा एस्कॅसिना, ब्रुना गोन्झालेस आणि क्लॉडिया प्लेसर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वेरोनिकाला IMDb वर 10 पैकी 6.2 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. वेरोनिका या चित्रपटाची कथा एस्टेफानिया गुटिएरेझ लाझारो नावाच्या मुलीच्या खऱ्या कथेवर आधारित असल्याचं बोललं जातं. जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे फॅन्स असाल, तर वेरोनिका चित्रपट अजिबात चुकवू नका.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!