Maushmi Chatterjee On Amitabh Bachchan: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जीने (Maushmi Chatterjee) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. अलीकडेच मौसमी यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करण्याविषयी भाष्य केलं आहे. स्टारडम मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वागण्यात बदल झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 


आनंदबाजार पत्रिकासोबतच्या संभाषणात मौसमी यांनी अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षांबद्दल अनेक खुलासे केले. एवढे मोठे यश मिळवण्यासाठी अमिताभ यांना खूप मेहनत करावी लागली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मौसमी यांच्या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 


मौसमी चॅटर्जी यांनी काय म्हटलं?


मौसमी यांनी म्हटलं की, "अमिताभ बच्चन यांनी खूप संघर्ष केला आणि कठोर परिश्रमानंतर ते मोठे झाले. जेव्हा तुम्हाला खूप काही मिळतं, तेव्हा तुमचं वागणंही बदलत. अशावेळी तुम्ही दुसऱ्यांची मदत करावी असाही विचार बऱ्याचदा करत नाही. अमिताभ यांचा भाऊ त्यांच्यासाठी कारची व्यवस्था करत असे. पण अमिताभ हे अत्यंत शांत होते. ते एकटेच रहायचे आणि त्यांच्या हेअरड्रेसरसोबतच जेवायचे. 


मौसमी यांनी अमिताभ यांच्या शिस्त आणि वक्तशीरपणाचेही कौतुक केले आहे.  त्यांनी म्हटलं की, ते आजही अगदी एखाद्या तरुणासारखेच आहेत. जर तुम्ही त्यांना सकाळी 6 वाजता तयार व्हायला सांगितलं, तर ते सकाळी 6 वाजताही तयार होती. त्यामुळे ते अत्यंत शिस्तप्रिय आहेत. मौसमी चॅटर्जी आणि अमिताभ बच्चन रोटी कपडा और मकान, बेनाम, हम कौन हैं? मंझिल आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.


अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचा 'वेट्टियाँ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट आहे. यापूर्वी बिग बी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसले होते. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.                                    


ही बातमी वाचा : 


Pushpa 2 Box Office Collection Day 18: पुष्पा 2 ने रचला इतिहास, भारतीय सिनेमाच्या 110 वर्षांमधील सर्वात मोठा सिनेमा!