Pushpa 2 Box Office Collection Day 18: बरोबर 18 दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) तेलुगु चित्रपट 'पुष्पा 2' (Pusha 2) प्रदर्शित झाला. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा या सिनेमाविषयी बरीच उत्सुकता होती. त्यातच अनेक मोठे मोठे रेकॉर्ड्स या सिनेमाने आतापर्यंत मोडले आहेत. पण आता भारतीय सिनेमाच्या इतिहासातला सर्वात मोठा रेकॉर्ड या सिनेमा बनवलाय. भारतीय सिनेमांच्या इतिहासातला 110 वर्षांतला सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 2021 च्या पुष्पा द राइजचा दुसरा भाग असलेल्या पुष्पा 2 द रुलने आज 18 व्या दिवशी देशातील सर्वाधिक कमाई करणारा बाहुबली 2 चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत या सिनेमाने किती कमाई केली त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
Saknilk वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, Pushpa 2 ने 4 डिसेंबर रोजी प्रीमियरमधून 10.65 कोटी रुपये कमावल्यानंतर किती कमाई केली याविषयी माहिती सध्या समोर आलेली आहे.
दिवस | कमाई |
पहिला दिवस | 164.25 कोटी |
दुसरा दिवस | 93.8 कोटी |
तिसरा दिवस | 119.25 कोटी |
चौथा दिवस | 141.05 कोटी |
पाचवा दिवस | 64.45 कोटी |
सहावा दिवस | 51.55 कोटी |
सातवा दिवस | 43.35 कोटी |
आठवा दिवस | 37.45 कोटी |
नववा दिवस | 36.4 कोटी |
दहावा दिवस | 63.3 कोटी |
अकरावा दिवस | 76.6 कोटी |
बारावा दिवस | 26.95 कोटी |
तेरावा दिवस | 23.35 कोटी |
चौदावा दिवस | 20.55 कोटी |
पंधरावा दिवस | 17.65 कोटी |
सोळावा दिवस | 14.3 कोटी |
सतरावा दिवस | 25 कोटी |
अठरावा दिवस | 33.25 कोटी |
एकूण | 1062.9 कोटी |
पुष्पा 2 ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड
पुष्पा 2 सिनेमाने 17 व्या दिवशी 1029.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत प्रभासचा बाहुबली 2 1030.42 कोटींची कमाई करून पहिल्या क्रमांकावर होता. आता पुष्पा 2 ला फक्त 52 लाखांची कमाई करुन बाहुबलीला मागे टाकायचे होते. आता या सिनेमाने ती कामगिरी केली आहे. यामुळे चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या सिनेमाची स्थिती पाहता हा सिनेमा लवकरच 1100 कोटींचा टप्पा पार करेल.भारतातील पहिला चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून, पुष्पा 2 ने गाठलेला हा आकडा एकही चित्रपट गाठू शकला नाही.
पुष्पा 3 ची चाहत्यांना प्रतीक्षा
दरम्यान पुष्पा 2 च्या शेवटी, पुष्पा 3 शी संबंधित एक इशारा देण्यात आला. याचा अर्थ असा की अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल येत्या काही वर्षांत पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत. पण अद्याप पुष्पा 3 बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.