Mohanlal Drishyam 3 Release Date: साऊथ सिनेमातील सुप्रसिद्ध कलाकार मोहनलाल (Mohanlal) आपला आगामी चित्रपट 'दृश्यम 3' (Drishyam 3) साठी चर्चेत आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. माहितीनुसार, मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संकट आणि तणावाचा थेट फटका जनसामान्यांना बसत आहे. तसेच सिनेसृष्टीलाही बसला आहे. मोहनलालचा दृश्यम 3 या सिनेमालाही या युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 'दृश्यम 3' हा चित्रपट आधी 2 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. परंतु, आता हा चित्रपट 21 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. फिल्ममेकर्सने याबाबतीत एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे.
फिल्ममेकर्सने या चित्रपटाविषयी एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फिल्ममेकर्स म्हणाले, 'त्याने सत्याला पुरले आहे. पण तो सत्याला कायमचे पुरु शकतो का? 'दृश्यम 3' आता 21 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार', असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. सध्या फिल्ममेकर्सने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दृश्यम साऊथ इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे. दृश्यम या सिनेमाचा आता लवकरच तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा दृश्यम फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. चाहते 'दृश्यम 3' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दृश्यम सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला पहिला पार्ट ब्लॉकबस्टर ठरला. 2021मध्ये प्रदर्शित झालेला दुसरा पार्टही ब्लॉकबस्टर ठरला. आता लवकरच या सिनेमाचा तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
साऊथसह बॉलिवूडमध्येही दृश्यम हा सिनेमा तयार करण्यात आला. अभिनेता अजय देवगणने हिंदीमध्ये दृश्यम हा सिनेमा तयार केला. डोकं चक्रवणाऱ्या सस्पेन्स चित्रपटाचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दृश्यमचा पहिला भाग 2015 साली प्रदर्शित झाला होता. तर, दुसरा भाग 2022 साली प्रदर्शित झाला होता. दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...
