Sharad Pawar on Iran Israel War : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता चार आठवड्यांपासून सुरू असून मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला (Economy) मोठाफटकासहनकरावालागतोय. दरम्यान, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला असून, जागतिक ऊर्जा संकट अधिक गंभीर झाले आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) मोठी वाढ झाली आहे. आशियामध्ये भारतीय चलनावर याचा विशेष परिणाम होत असून, डॉलरच्या तुलनेत ते 94.01 पर्यंत घसरले आहे. दरम्यान, एकंदरीतयापरिस्थितीवरराष्ट्रवादीचेजेष्ठनेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीवरून चिंता व्यक्त करण्यातआलीय. महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना गॅस टंचाईसोबत युद्धजन्य परिस्थितीवरून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलीय. (Sharad Pawar on Iran Israel War)
युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर आणखी चित्र वेगळं असू शकतं, परिणामी टंचाई अधिक तीव्र होऊ शकते. अशीभीतीत्यांनीव्यक्तकेलीआहे. एवढ्या दिवस युद्ध सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धावर केलेल्या वक्तव्यावरून देखील शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलीय. एवढ्या दिवस युद्ध सुरु असताना भारतात त्याची झळ बसत आहे. मात्र यावर पंतप्रधानांनी उशीरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही. तसेच महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर (Rajya Sabha) संधी दिल्याने शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे यावेळी आभार देखील मानले.
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी पुष्पगुच्छप्रमाणे अशीच टवटवीत राहो
दुसरीकडे, महाविकास आघाडी पुष्पगुच्छप्रमाणे अशीच टवटवीत राहो, अशाशब्दातशिवसेनाठाकरेगटाचेसर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनीभाष्यकरतशुभेच्छादिल्याय. शरद पवारांची महाविकास आघाडीच्या वतीने राज्यसभा खासदार म्हणून निवडुन आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा देण्यातआल्याय. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर शरद पवारांच्या कार्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक करण्यातआलं. राजकारण, समाजकारण पवार साहेबांनी त्या त्या ठिकाणी ठेवलं. बाळासाहेब आणि पवारसाहेब चांगले मित्र होते. दोघेही केव्हा सुडबुद्धीने वागले नाहीत. स्टेजवर पवार साहेबांनी राजकारण केलं, खाली आल्यावर त्यांनी त्यांचे संबंध ठेवले. असेहीउद्धवठाकरेम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
