Soumya Tandon Opens Up About Missing Akshaye Khanna: सध्या प्रेक्षकांमध्ये धुरंधर 2 (Dhurandhar 2) ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारांपर्यंत, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. केवळ धुरंधर नाही तर त्याच्या दुसऱ्या पार्टनेही सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडण्यास सुरुवात केली आहे. धुरंधरमध्ये रहमान डकैत, अभिनेता अक्षय खन्नाच्या (Akshaye khanna) पात्राची हत्या करण्यात येते. धुरंधर 2 या चित्रपटाच्या सुरुवातीला रहमान डकैतची पत्नी उल्फत रहमानची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने (Soumya Tondon) आपल्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. धुरंधर 2 मध्ये अभिनेत्रीने अक्षय खन्नाला मिस केलं, असं सांगितलं.
धुरंधरच्या पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्ना आणि सौम्या टंडन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, दुसऱ्या पार्टमध्ये रहमान डकैतची हत्या होते. त्यामुळे सौम्या टंडनची सुरुवातीलाच काही मिनिटांसाठी रोल आहे. सौम्या टंडन ही भूमिका साकारताना अभिनेत्रीचा अनुभव कसा होता? याबद्दल तिनं सांगितलं. 'धुरंधर 2 पाहताना एक प्रेक्षक म्हणून मी अक्षय खन्ना यांना मिस केलं', असं मुलाखतीत सौम्या टंडन म्हणाली.
मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'धुरंधर 2 या चित्रपटात माझा छोटासा रोल होता. खरं सांगायचं झालं तर, धुरंधर 2 मध्ये मला खास करण्यासारखं काहीच नव्हते. माझा फक्त एक सीन सोशल मीडियात व्हायरल झाला होता. परंतु, या सीनवर मला फार काही बोलायचं नाही. कारण, मला असं वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा', असं अभिनेत्री म्हणाली.
'धुरंधर 2मध्ये मी जी भूमिका साकारली आहे. ती प्रचंड इंटेंस आहे. कारण या सीनमध्ये रहमान डकैतच्या अंत्यविधीचा सीन दाखवण्यात आला आहे. हा माझ्यासाठी खूप अवघड सीन होता. कारण उल्फत डकैत जी रहमानची बायको असते, ती खूप रागात असते. तसेच ती अशा परिस्थितीत असते, बऱ्याच भावना तिच्या मनातून बाहेर येतात. एकंदरित पाहायला गेलं तर, ती पूर्णपणे हतबल होते', असं अभिनेत्री म्हणाली. धुरंधर चित्रपटात सौम्या टंडन अनेक दृश्यांमध्ये दिसली. दरम्यान, धुरंधर 2मध्ये तिचा पहिल्याच पार्टमध्ये रोलं संपतो. ती फक्त एकाच सीनमध्ये दिसते.
