Miss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.


कोण आहे हरनाज संधू?
हरनाज संधू चंदीगडची राहणारी असून मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाज ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.



" data-captioned data-default-framing width="400" height="400" layout="responsive">


कमी वजनामुळे व्हायची चेष्टा
विश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाज शाळेत असताना फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची.  यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.


हरनाजने मिळवलेले किताब
2017 - टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 - मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 - फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 - मिस युनिवर्स इंडिया


2021 - मिस युनिवर्स


 


इतर संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha