Jhimma song Maze Gao : मराठी चित्रपट 'झिम्मा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव आणि मृण्मयी गोडबोले या कलाकरांची भन्नाट स्टार कास्ट या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 


'कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव' हे झिम्मा चित्रपटातील गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गाण्यामध्ये या चित्रपटातील सर्व कलकार एका शहरामध्ये फिरताना दिसत आहेत. या गाण्याला  अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गाण्याच्या संगिताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शिन प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शित  हेमंत ढोमे याने केले आहे. ‘झिम्मा’ चित्रपट 19 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.


Samantha Ruth Prabhu Instagram: नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट; म्हणाली, 'मी योद्धा '


'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक  उत्सुक आहेत. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि एकमेकींना पूर्णपणे अनोळखी असलेल्या स्त्रिया मनमुराद जगण्यासाठी काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत इंग्लंडला फिरायला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे.  अभिनेत्री क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 



Raj Kundra Social Media Delete : राज कुंद्राकडून सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट ; शिल्पाची पोस्ट चर्चेत


Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक