Ms Marvel Trailer : मार्वल स्टुडिओच्या (Marvel Studios) बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिस मार्वल’चा (Ms Marvel) आज (8 जून) ग्रँड प्रीमिअर होणार आहे. अभिनेत्री इमान वेलानी (Iman Vellani) यात ‘कमला खान’च्या (Kamala Khan) भूमिकेत दिसत आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) मार्वल स्टुडिओच्या पहिल्या मुस्लिम सुपरहिरो सीरीज 'मिस मार्वल'मध्ये झळकणार आहे.


मार्वलच्या या सीरीजमध्ये बॉलिवूड सुपरस्टार फरहान अख्तर पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत फरहान अख्तरच्या व्यक्तिरेखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



सना अमानत, स्टीफन वॅकर, जी. विलो विल्सन, एड्रियन अल्फोना आणि जेमी मॅकेल्वी यांनी तयार केलेले मार्वल कॉमिक्स पात्र ‘कमला खान’वर आधारित आहे. मार्वल युनिव्हर्समधली ही पहिलीच मालिका असेल, ज्यामध्ये मुस्लिम सुपरहिरो दाखवण्यात आली आहे. ‘मिस मार्वल’ आतापर्यंतची अनोखी कहाणी जगासमोर मांडणार आहे.


कोण आहे ‘मिस मार्वल’?


‘मिस मार्वल’ची निर्मिती बिशा के अली यांनी केली आहे. हे मार्वल पात्र कॉमिक्स कमला खानच्या पात्रावर आधारित आहे. कमला खान ही एक मुस्लिम अमेरिकन मुलगी आहे, जी तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत सुपरहिरो बनते. मार्वल कॉमिक्समधील ती पहिली मुस्लिम सुपरहिरो आहे. मार्वल युनिव्हर्समधली या सीरीजमध्ये अभिनेत्री इमान वेलानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, सागर शेख, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ, झेनोबिया श्रॉफ आणि मोहन कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहेत. सहा भागांची ही सीरीज 8 जूनपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


फरहान अख्तरची कारकीर्द


बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या करिअरमध्ये ‘तुफान’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘दिल चाहता है’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो केवळ एक उत्तम अभिनेताच नाही, तर गायक आणि दिग्दर्शकही आहे. फरहान अख्तरने या वर्षी अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्याशी दुसरे लग्न केले.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :