Monsoon Update in India : पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गरमीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान मान्सून भारतात दाखल झाला असून कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळला आहे. 15 जूनपासून मान्सून वेग पकडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. यानुसार 15 जूननंतर देशभरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील किमान एक आठवडा पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.


सध्या उत्तर प्रदेशातील बांदा येथी 46.6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेपासून सुटका मिळणार नाही. राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या इतर राज्यांमधील किमान 37 शहरे आणि शहरांमध्ये 44 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, नैऋत्य मान्सून तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागात सरकताना दिसत आहे.