Emraan Hashmi :  बॉलीवूडमधल्या (Bollywood) बोल्ड सिनेमांविषयी जेव्हा चर्चा केली जाते, तेव्हा अभिनेचा इमरान हाशमी (Emraan Hashmi) याचं नाव घेतलं जातं. त्याचे सिनेमे हे कधी कौटुंबिक नसायचे. पण अजहर सिनेमापासून त्याने या मर्यादा मोडून काढल्या. इमरान आता त्याच्या 'शोटाईम पार्ट 2' या वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचनिमित्ताने त्याने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी त्याने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. 


इमरान हाशमीचे सिनेमे हे कोणत्याच घरात एकत्र पाहण्यासारखे नसायचे. मग हे सिनेमे त्याच्याच घरात पाहिले जायचे का? असा प्रश्न यावेळी त्याला विचारण्यात आला. त्यावर इमरान प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे त्याने इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. 


माझ्या घरात त्या सीन्सच्या वेळी सिनेमा पळवायचे - इमरान हाशमी


इमराने म्हटलं की, जेव्हा माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स यायचे तेव्हा आम्ही ते फॉरवर्ड करायचो. त्यावेळी व्हीएचएस असायचा. तुमचं बरोबर आहे. कारण मीही जेव्हा शाळेत होतो, एखाद्या इंग्रजी सिनेमात तसे सीन्स यायचे.तेव्हा तो सीन फॉरवर्ड केला जायचा किंवा तो सिनेमा पाहणं बंद केलं जायचं आणि मला खोलातून बाहेर जायला सांगयाचे. 


लिपलॉक सीन कसा शूट होतो?


इम्रान हाश्मी याने सांगितले की, लिपलॉक सीन्स हे कधीकधी ओरिजनल शूट केले जातात. तर कधी-कधी वेगवेगळे शूट केले जाते. वेगवेगळे शूट झालेले सीन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्र केले जातात. प्रेक्षकांना वाटते की हा सीन खरा आहे. लिपलॉक सीन्सच्या शूटिंगसाठी बऱ्याच अभिनेत्री उत्सुक नसतात. अभिनेतेदेखील अशा शूटच्या वेळी कम्फर्ट  नसतात, असेही इम्रान हाश्मीने सांगितले. 


इम्रान हाशमीचे फिल्मी करिअर...


इम्रान हाशमीने 2002 मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला 'मर्डर' (2004) या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. यानंतर इम्रान हाशमीने 'मर्डर 2', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज 3', 'आवारापन', 'हमारी अधुरी कहानी', 'जेहर', 'जन्नत 2', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' 'टायगर 3' आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओटीटीवर त्याने दोन वेब सीरिजमध्येही काम केले आहे.                            



ही बातमी वाचा : 


Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...