Entertainment News : मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज (Jio Studio) आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Tin Char) या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
एक, दोन, तीन, चार या चित्रपटाचं दिग्दर्शन वरूण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी केलं आहे. मुरांबा या बहुचर्चित चित्रपटानंतरचा त्यांचा हा पुढील चित्रपट असणार आहे.
तरूणाईची गोष्ट :
निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण 23 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत! या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
‘एक दोन तीन चार’ बद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, “आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की, तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे जोडपं घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरी’ सर्वांनाच आपलीशी वाटेल.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि 16 बाय 64 प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ghe Double : ‘घे डबल’चा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; कॉमेडी किंग भाऊ कदम आणि भूषण पाटील यांच्या भूमिकांचा डबल धमाका !
- Timepass 3 : 'टाइमपास 3' चा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर; 16 सप्टेंबर रोजी करण्याची ZEE5 होणार प्रदर्शित