‘पांडू’, ‘झोंबिवली’ आणि ‘धर्मवीर’ या यशस्वी मराठी चित्रपटांचा प्रीमअर केल्यानंतर भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म व बहुभाषिक कथाकथनकार असलेल्या ZEE5 या ओटीटीवर 'टाइमपास 3' या चित्रपटाचा 16 सप्टेंबर रोजी प्रीमिअर होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून या फ्रान्चायझीमध्ये प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


दिग्दर्शक रवी जाधव यांनी 2014 मध्ये टाइमपास हा चित्रपट आणला होता आणि 2015 रोजी या चित्रपटाचा सीक्वलही प्रदर्शित झाला. पहिल्या चित्रपटात दगडू व प्राजक्ता या दोन शाळकरी वयातील मुलांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली होती. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. टाइमपास 2 चे कथानक 15 वर्षांनी घडते असे दाखविण्यात आले होते आणि या चित्रपटाच प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या फ्रान्चायझीच्या तिसऱ्या भागात ही कथा पुन्हा एकदा दगडूकडे वळते, जी व्यक्तिरेखा पुन्हा एकदा प्रथमेश परबनेच साकारली आहे. या फ्रान्चायझीचे तीनही भाग ZEE5 वर उपलब्ध आहेत.


या वेळी दगडूने त्याची बारावीची परीक्षा 36 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे आणि आता तो कॉलेजमध्ये जाणार आहे. दगडूला त्याचे गुंडगिरीचे दिवस विसरून नवी सुरुवात करायची आहे. पण त्याच्या या प्रवासात अनेक जण त्याची वारंवार परीक्षा घेत असतात. कारण त्यांच्या मते दगडू बदलणे शक्यच नाही. त्याला आपली ही नवी प्रतिमा कायम ठेवणे गरजेचे असते. कारण तो आता त्याच्या वर्गात असलेल्या पालवीच्या प्रेमात पडला आहे. पालवी एका गँगस्टरची मुलगी आहे. दगडूच्या ‘जंटलमन’ प्रतिमेची पालवीला भुरळ पडली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतो, तसे दगडूने पांघरलेली ही झूलही उतरते. असे झाल्यावर दगडू-पालवीच्या नात्यावर काही परिणाम होतो का, हे या चित्रपटात उलगडणार आहे.


'टाइमपास 3' या चित्रपटाला IMDB वर 7.3  इतके मानांकन मिळाले आहे आणि या चित्रपटात संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपट निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, ज्यात विनोद व रोमान्स भरपूर आहे. अथांश कम्युनिकेशन आणि झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा 16 सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रीमिअर होणार आहे. 


ZEE5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कार्ला म्हणाले, “मराठी प्रेक्षकांशी जोडण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही लोकप्रिय मराठी चित्रपट संपादिक करण्यावर भर देत आहोत. स्थानिक भाषेतील दर्जेदार मनोरंजनाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पांडू, झोंबिवली व धर्मवीर या चित्रपटांच्या यशानंतर 'टाइमपास 3' हा अजून एक निखळ मनोरंजन करणारा चित्रपट सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा चित्रपट सगळ्या कुटुंबाचे मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि विनोद, रोमान्स व नाट्य यांचे चपखल मिश्रण या चित्रपटात आहे आणि लोकांचे प्रेम लाभलेल्या या फ्रान्चायझीचे चाहते असलेल्यांना हा चित्रपट निश्चितच आवडेल.”


दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, “आमच्या चित्रपटाची दुसरी इनिंग्ज ZEE5 या भारतात स्थापन झालेल्या सर्वात मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १६ सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. टाइमपास ही मराठी चित्रपटांमधील सर्वात मोठी व सर्वात यशस्वी फ्रान्चायझी आहे. प्रत्येक चित्रपट मनापासून तयार केलेला आहे आणि यात भरपूर विनोद, चांगला उद्देश आणि निखळ मनोरंजन करण्याचा आमचा हेतू आहे. म्हणूनच 'टाइमपास ३' या आमच्या नव्या भागातील आमचे प्रयत्न  डिजिटल प्रीमिअरच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि या आधीच्या भागांप्रमाणे हा चित्रपटही तेवढाच सुपरहिट होईल.


अभिनेता प्रथमेश परब म्हणाला, “'टाइमपास ३' हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट आहे आणि या चित्रपटात काम करणे म्हणजे घरी परतल्यासारखे होते. या निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा मला आनंद आहे आणि आता या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरसह आम्ही 190 पेक्षा जास्त देशांतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. कारण ही ZEE5ची ताकद आहे.


अभिनेत्री ऋता दुर्गुळे म्हणाली, “या चित्रपटात काम करणे हा एक धमाल प्रवास होता आणि या यशस्वी फ्रान्चायझीचा एक भाग होणे हा माझा बहुमान समजते. आता हा चित्रपट चाहत्यांचा झाला आहे आणि हा चित्रपट आता त्यांना ZEE5 वर पाहता येणार आहे आणि त्यांचे प्रेम या चित्रपटाला लाभणार आहे, याबद्दल मी खूपच रोमांचित आहे. वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरला भरघोस यश मिळेल, अशी मला आशा आहे.”